बियर घेतल्यानंतर मालकानं केली मागील पैशांची मागणी अन् आरोपींनी दुकानात केलं धकाकदायक कृत्य 

प्राप्त माहितीनुसार, आशिष हे हुडकेश्वर हद्दीतील मानेवाडा रोड येथील आपल्या सेव्हन स्टार बियर शॉपीमध्ये शनिवारी सायंकाळी होते.
प्राप्त माहितीनुसार, आशिष हे हुडकेश्वर हद्दीतील मानेवाडा रोड येथील आपल्या सेव्हन स्टार बियर शॉपीमध्ये शनिवारी सायंकाळी होते.

नागपूर : बियर शॉपीमध्ये गेलेल्या सात आरोपींनी बियरचे बील देण्यावरून बियर शॉपीच्या मालकाशी वाद घातला. वादात आरोपींनी चक्क मालकाच्या डोक्यावर बियरची बॉटल फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. आशिष मनोहर आचार्य (३४) रा. ज्ञानेश्वर नगर असे जखमीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आशिष हे हुडकेश्वर हद्दीतील मानेवाडा रोड येथील आपल्या सेव्हन स्टार बियर शॉपीमध्ये शनिवारी सायंकाळी होते. दरम्यान आरोपी दोन्ही भाऊ रणधीर राजू मानेकर (२९), हर्षराज राजू मानेकर (२४) रा. रघुजी नगर आणि त्यांचे ५ साथीदार आशिष यांच्या बियर शॉपीमध्ये आले. त्यांनी बियर घेतली. बियर घेतल्यानंतर मागील थकबाकी न दिल्याचे आशिष यांनी आरोपींना विचारणा केली. 

यावरून रणधीर, हर्षराज या दोन्ही भावंडांनी आणि त्यांच्या ५ साथीदारांना आशिष यांच्याशी वाद घातला. आरोपींनी आशिष यांना शिविगाळ केली. रणधीर आणि हर्षराज या दोन्ही भावंडांनी आशिष यांच्या डोक्यावर चक्क बियरची बॉटल फोडली. त्यांना हाथबुक्कीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यामुळे बियर शॉपीच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

बियर शॉपीमध्ये धिंगाणा घालून आरोपीनंतर फरार झाले. आशिष यांनी याप्रकरणाची तक्रार हुडकेश्वर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासातच रणधीर आणि हर्षराज या दोन्ही भावडांना अटक केली. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com