कोरोना काळात वाढल्या आहेत सामाजिक-मानसिक समस्या!

stress-
stress-

नागपूर : कोरोनाने केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम केला असे नसून मानसिक आरोग्यावरही परिणाम केला आहे आणि इतकेच नव्हे तर सामाजिक सौख्यही कोरोनाच्या आक्रमणात नष्ट झाले आहे. या सामाजिक स्थित्यंतराच्या काळात मानसिकतज्ज्ञांची समाजाला विशेष गरत असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या बेबिनारमध्ये अधोरेखित झाले.

कोराना विषाणूमुळे आरोग्याच्या समस्या कमी परंतु, मानसिक आणि सामाजिक समस्या म्हणजेच "सायको सोशल प्रॉब्लेम' अधिक वाढले असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये "कोराना काळात समुपदेशकांची भुमिका' या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. वेबिनारमध्ये डॉ. अरविंद राज यांनी "समुपदेशनाच्या पद्धती, त्यातील बदल' या विषयावर मार्गदर्शन केले. तर, आयजेएमच्या श्रीमती शालिनी यांनी समुपदेशकांनी स्वतः काय काळजी घ्यावी तसेच शासकीय यंत्रणा, समाजसेवी संस्थांचे समुपदेशक यांनी कोरोना काळात नागरिकांचे समुपदेशन करतांना काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली
.
वेबिनारमध्ये बोलतांना डॉ. अरविंद राज म्हणाले की, कोरोना या आजाराने लोकांची मानसिक स्थिती पुर्णतः ढासळली आहे. भारतात कोविड 19 विषाणूने बाधीत मृत्यूचा दर कमी आहे. परंतु, या काळात आलेल्या बेरोजगारी व नैराश्‍यामुळे झालेल्या आत्महत्या आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत समुपदेशकांची भूमिका महत्वाची ठरत असून, आपण समाजात सकारात्मकता पसरवणे गरजेचे झाले आहे.

जेवणातील मीठाप्रमाणे जीवनातील प्रसन्नता
रोजच्या जेवणात ज्या प्रमाणे मीठाचे महत्व आहे. त्याचप्रमाणे जीवनातील प्रसन्नताही महत्वाची असते. अन्नात मीठ नसले तर, अन्न बेचव लागते त्याप्रमाणे जीवनातील प्रसन्नता निघून गेल्यास, जीवन निरस आणि अर्थहिन वाटू लागते. कोरोनामुळे लोकांमध्ये प्रसन्नता कमी झाल्याने, निराशा आणि उदासिनता पसरली आहे. समुपदेशकांनी लोकांशी संवाद साधून जीवनातील आनंद परत आणण्याची गरज आहे.

स्पर्शातील उब हरवली
सोशल डिस्टसिंगच्या नावाने नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. नोकरी करणारे नवरा बायको, मुले, आई वडील या नात्यातील स्पर्श कमी झाल्याने, स्पर्शातील उब कमी झाली आहे. ही छोटी गोष्ट वाटत असली तरी, यामुळे असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. याचे परिणाम दूरगामी झाल्याचे होणार असल्याचे मत, समुपदेशकांनी वेबिनारमध्ये व्यक्त केले.

हेही वाचा - नागपुरातही आहेत "डान्सिंग अंकल'; वजन 105 किलो तरीही...

समुपदेशकांनी दिल्या टिप्स

  • खुुप झोप येणे किंवा खुप कमी झोप येणे ही दोन्हीही नैराश्‍याची लक्षणे आहेत.
  • नैराश्‍याची लक्षणे असल्यास, मेडीटेशन, योगा, प्राणायाम नियमित करावा.
  • जाणीवपूर्वक सकारात्मक बदल घडवून आणावेत.
  • स्ट्रेसमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्यापासून दूर राहावे.
  • मोबाईल चार्ज करतो त्याप्रमाणे आपल्या मनालाही विविध गोष्टींतून चार्ज करावे.
  • आपल्या प्रसन्नतेचा कप कायम पूर्ण भरलेला असावा.
  • जीवनातील आशा कायम ठेवा.
  • इतरांचे ऐकून जीवनात नकारात्मकता पसरू देऊ नका.
  • वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन हे दोन्ही वेगळे आहेत याचे भान ठेवा.
  • भविष्य स्वच्छ आणि सुंदर आहे यावर विश्‍वास ठेवा.

  •  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com