नागपूरकरांना आवडे मेट्रो प्रवास, 11 टक्‍क्‍यांची प्रवासी संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

महामेट्रो प्रवासी संख्येचा दर आठवड्यात आढावा घेत आहे. 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या आठवड्याच्या तुलनेत 3 ते 9 फेब्रुवारीपर्यंतच्या आठवड्यात तब्बल 11 टक्‍क्‍यांनी प्रवासी वाढीची नोंद करण्यात आली. हिंगणा मार्गावरील प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रोतून प्रवाशांची संख्या वाढत आहे. काल, रविवारी तब्बल 18 हजार 77 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. यातून महामेट्रोला सव्वा तीन लाखांचे उत्पन्न मिळाले.

नागपूर : खाजगी वाहने सोडून नागपूरकरांनी आता मेट्रोतून प्रवासाला पसंती दिल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत मेट्रोतील प्रवासी संख्येत 11 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. दिवसेंदिवस मेट्रोतून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून सुटीच्या दिवशी मेट्रोवर उड्या पडत आहेत.

महामेट्रो प्रवासी संख्येचा दर आठवड्यात आढावा घेत आहे. 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या आठवड्याच्या तुलनेत 3 ते 9 फेब्रुवारीपर्यंतच्या आठवड्यात तब्बल 11 टक्‍क्‍यांनी प्रवासी वाढीची नोंद करण्यात आली. हिंगणा मार्गावरील प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रोतून प्रवाशांची संख्या वाढत आहे. काल, रविवारी तब्बल 18 हजार 77 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. यातून महामेट्रोला सव्वा तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. हिंगणा मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने एमआयडीसीमधील चाकरमाने, विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोठी सुविधा झाली. हिंगणा मार्गावर दर अर्ध्या तासाने मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सिताबर्डी मेट्रोला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे.
नागरिक लुटत आहेत प्रवासाचा आनंद

सविस्तर वाचा - नसबंदी स्वागतार्ह, श्‍वानांच्या उपद्रवाचे काय?
लोकमान्यनगर ते सिताबर्डी व सिताबर्डी ते खापरीपर्यंतच्या प्रवासासाठी केवळ 30 रुपये तिकिट दर आहे. त्यामुळे हिंगणा मार्गावरील प्रवासी मेट्रोतून प्रवासाचा आनंद लुटत आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर किंवा वासुदेवनगरपर्यंत प्रवासासाठी प्रवाशांना केवळ 20 रुपये मोजावे लागत असून सिताबर्डी इंटरचेंज ते सुभाष नगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स किंवा झाशी राणी चौक मेट्रो स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी केवळ 10 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे हिंगणा मार्गावरील स्टेशन असो की लोकमान्यनगर ते खापरीपर्यंतचा प्रवास असो, नागरिक बिनधास्तपणे प्रवासाचा आनंद लुटत आहे. सुटीच्या दिवशी प्रवासी संख्येत आणखी भर पडत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro rocks in Nagpur city