दिवसाढवळया "तो' चक्‍क अधिकाऱ्यामागे धावला कोयता घेऊन , कारण काय होते.......

file
file


कामठी  (जि.नागपूर) : प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णामागे नगर परिषदला शासनाकडून पैसे मिळत आहेत. तुम्ही जास्तीत जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा दावा सिद्‌ध करता व कोरोना पॉझिटिव्हच्या नावावर नागरिकांना वेठीस धरून त्यांना मानसिक त्रास देता. तेव्हा तू येथून उलटपायी परत जा, अशी धमकी देत युवकाने अधिकाऱ्याला अश्‍लील शिवीगाळ केली अधिका-यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला. न.प.कर्मचारी जीव वाचवित पळल्याने अनर्थ टळला.

युवकाने केला प्रक्रियेला विरोध
कामठी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून रविवारी एकाच दिवशी तब्बल29 रुग्ण कोरोनाबधित आढळल्याने शहराला अजून एक धक्का बसला. बाधित रुग्णाचा परिसर प्रतिबंधित करणे तसेच कोरोनाबाधित रुग्णाला नागपूर येथील मेयो इस्पितळात नेण्याची प्रक्रिया सगळीकडे सुरू असताना जयभीम चौकातील एक महिला कोरोनाबाधित आढळली. तिचा राहिवासी परिसर प्रतिबंधित करणे तसेच त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेला नागपूरच्या आयसोलेशन वार्डात घेऊन जाणे तसेच प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या लोकांना क्‍वारंटाईन करण्यासाठी नगर परिषदचे रचना सहायक गट (ब) पदावर कार्यरत अधिकारी प्रज्योत काकडे गेले. त्या परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या एक तरुणाने या प्रक्रियेला विरोध केला.

आल्यापावली परत जा !
प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णामागे नगर परिषदला शासनाकडून पैसे मिळत आहेत. तुम्ही जास्तीत जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा दावा सिद्‌ध करता व कोरोना पॉझिटिव्हच्या नावावर नागरिकांना वेठीस धरून त्यांना मानसिक त्रास देता. तेव्हा तू येथून उलटपायी परत जा, असे म्हणत युवकाने अश्‍लील शिवीगाळ केली अधिका-यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला. या तरुणाचा राग इथेच शमला नाही तर त्याने थोड्याच वेळात धारदार कोयता हाती घेऊन नगर परिषद अधिकाऱ्याला मारायला धावला. यावर त्या अधिकाऱ्याने कसाबसा आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढला. सुदैवाने कर्मचारी एका घरात जाउन लपल्याने अनर्थ टळला. तर यासर्भात फिर्यादी नगर परिषद अधिकारी प्रज्योत काकडे यांनी नवीन कामठी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आशीष उर्फ (चिपळ्या मामा) प्रमोद बागडे (वय26, जयभीम चौक कामठी)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक केली.
अधिक वाचा : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी, काय घडले असे...

आरोपीवर विविध पोलिस ठाण्यात अनेक चोरी व हल्ल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता कर्मचारी या घटनेने भीतीच्या वातावरणात असून काम करायचे तरी कसे, असा विचार करीत आहेत. दर दिवशी शहरात कोविडचे रुग्ण वाढत असून याकरिता नगरपालिका क्षेत्रात हे काम या कर्मचा-यांकडे असते. मात्र जनता सहकार्य करीत नसल्याचे अनेक कर्मचा-यांनी सांगितले. या कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अफवा पसरविणा-यांवर कार्यवाही करणार
खोटे व समाजाला दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने परिणामी नागरिकाची मानसिकता ढासळून प्रशासनाविषयी अश्विश्वास दाखविण्यात येतो. असे खोटारडे मेसेज करणारे तसेच प्रत्यक्ष असे खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करणयात येईल. याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
अरविंद हिंगे, तहसीलदार, कामठी

संपादन : विजयकुमार राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com