ते' खिशात पैसा नसताना उपाशीपोटी शोधत होते गावाकडचा रस्ता, मग घडले असे...

रूपेश खंडारे
Sunday, 19 July 2020

संकटकाळात काही असमिाजिक तत्व गरजूंची फसवणूक करून पळून जातात तेव्हा माणसांवरचा विश्‍वास उडून जातो. याचा प्रत्यय शुक्रवारी हैद्राबादवरुन बिहारकडे निघालेल्या चार मजुर युवकांना आला.
 

पारशिवनी (जि.नागपूर):  कोरोना व्हायरस जिवघेणा असला तरी त्याहीपेक्षा जिवाला मनस्ताप देणारा प्रकार समाजात नेहमी घडत असल्याचे अनुभवावरून दिसून येते. संकटकाळात काही असमिाजिक तत्व गरजूंची फसवणूक करून पळून जातात तेव्हा माणसांवरचा विश्‍वास उडून जातो. याचा प्रत्यय शुक्रवारी हैद्राबादवरुन बिहारकडे निघालेल्या चार मजुर युवकांना आला.

अधिक वाचा : नराधमाला बाप म्हणावे की आजोबा? सावत्र बापाने केलेल्या बलात्कारातून मुलीची प्रसुती

"त्यांच्या' समोर पडला मोठा प्रश्‍न
लॉकडाउनच्या काळात चार मजूर बिहार येथील पाटण्याला घरी जात होते. आधी वाहनचालकाने पैश्‍यासाठी पाटणा येथे सोडून देतो म्हणून नागपूरपर्यंत पोहोचविले व नंतर उतरवून दिले अन्‌ं पळ काढला. नागपूरच्या ऑटो चालकाने मी गावी सोडून देतो म्हणून बळजबरीने ऑटोत बसण्यास सांगितले. या भागातील काहीच माहिती नसल्याने भीतीपोटी ते चौघे ऑटोत बसले. इकडे तिकडे फिरवून आणल्यानंतर चालकाने या युवकांकडून तीन हजार रूपये उकळले. आता पैसे संपल्याने करावे तरी काय, असा प्रश्न समोर असताना पोटात अन्नाचाही कण नव्हता. सोबत असलेले साहित्य डोक्‍यावर घेउन ते चालत असताना पारशिवनी गाठली. पैसे संपल्यावर आता काय करायचे तर पायदळ मोबाईलवर "मॅप' पाहत बिहारच्या दिशेने जात असता पारशिवनीला हे युवक उपाशी येताना दिसले. रस्ता विचारीत असताना एकाची प्रकृती खालावली होती.

अधिक वाचा :  पाऊस आला धावून, शेत गेले वाहून, मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान   

सामाजिक कार्यकर्ते आले धावून
त्यांची अवस्था पाहून स्थानिक युवकाने सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करुन या युवकाची माहिती दिली. लागलीच त्या मजूर युवकांना पारशिवनी बस स्थानकावर आणले. विचारपुस केल्यावर त्यांनी सर्व हकीकत सांगितली. परिस्थिती पाहता त्यांना आधी अंधोळीकरीता पाणी दिले. इस्टमित्रांना या घटनेटी माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते जगदिश मोहड यांनी जेवणाची व्यवस्था केली. कुणी औषधी आणून दिली. रात्रीला त्यांना कुठे सोडायचे, हा प्रश्न असल्याने त्यांना बसस्थानकावरच झोपण्यासाठी जागा उपलब्ध करुन पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली. सकाळी पुन्हा त्यांच्या चहापाण्याची व जेवणाची सोय करुन देण्यात आली. आता पैसा नसल्याने त्यांना पाठवायचे कसे, तर या मार्गावरून पाटण्याकडे जाणारे वाहन शोधण्यात युवकांना यश आले. त्या चारही युवकांना बिहारच्या दिशेने रवाना करतेवेळी त्या युवकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
 
संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They were starving when they had no money in their pockets