खवय्यांमध्ये बर्ड फ्लूची भीती : चिकनच्या विक्रीत किरकोळ घट; विक्रेत्यांमध्ये चिंता

योगेश बरवड
Sunday, 10 January 2021

येणाऱ्या दिवसांमध्ये परिस्थिती निश्चितच सुधारेल असा विश्वास व्यक्त करीत आहे. त्याच वेळी दबक्या आवाजात फ्लूमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीबाबत चिंताही व्यक्त केली. ग्राहक घटण्याच्या भीतीने अनेक विक्रेत्यांनी चिकनचे दर प्रतिकिलो २० ते ३० रुपयांनी कमी केले आहेत.

नागपूर : बर्ड फ्लूसंदर्भात देशभरातून वृत्त येऊ लागल्याने उपराजधानीतील खवय्येसुद्धा धास्तावले आहेत. तूर्त चिकन विक्रीत घट झाली असली तरी ती अगदीच किरकोळ आहे. मात्र, पशुवैद्यकांनी शिजवलेल्या चिकनमधून बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव होत नसल्याने सांगून खवय्यांना चिंता न करण्याचा सल्ला दिला आहे.

लॉकडाउननंतर आता व्यवसाय सावरत असताना पुन्हा बर्ड फ्लूच्या वृत्ताने धडकी भरवली आहे. अद्याप नागपूर किंवा लगतच्या भागात बर्ड फ्लूच्या संसर्गाची नोंद झाली नसली तरी खवय्ये सावधगिरी बाळगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चिकन विक्रीत घट झाली आहे. पण, व्यावसायिक हित लक्षात घेऊन विक्रीतील घट मार्गशिष महिन्यामुळे असल्याचा युक्तिवाद विक्रेते करतात.

सविस्तर वाचा -  'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरीत शोककळा; सरपंचांनाही अश्रू अनावर

येणाऱ्या दिवसांमध्ये परिस्थिती निश्चितच सुधारेल असा विश्वास व्यक्त करीत आहे. त्याच वेळी दबक्या आवाजात फ्लूमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीबाबत चिंताही व्यक्त केली. ग्राहक घटण्याच्या भीतीने अनेक विक्रेत्यांनी चिकनचे दर प्रतिकिलो २० ते ३० रुपयांनी कमी केले आहेत.

सध्या कॉक्रेलचे प्रतिकिलो दर १६० ते १८० रुपये, बॉयलर व लेगहॉर्न १०० ते १२० रुपये आहेत. २०० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हैदराबादी चिकनचे प्रतिकिलो दर १८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

क्लिक करा - धक्कादायक वास्तव! नागपुरी संत्रा उत्पादनात पिछाडला; महाराष्ट्राची दहाव्या स्थानी घसरण

मटणाचे दर पुन्हा वधारले

बर्ड फ्लू ही संधी मानून मटण विक्रेत्यांनी पुन्हा दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात मटणाचे प्रतिकिलो दर ७५० रुपयांच्याही पुढे गेले होते. आता पुन्हा मटणाचे दर वाढविले जाऊ लागले आहेत. अनेक विक्रेते ६८० रुपयांपेक्षाही अधिक दराने मटणाची विक्री करीत असल्याचे दिसते. वेगवेगळ्या भागात दरही वेगवेगळे आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor decline in chicken sales bird flu and chicken marathi news