आमदार निवासातील ती खोली दोन दिवसांपासून आतून बंदच!

Nagpur-Aamdar-Niwas
Nagpur-Aamdar-Niwas

नागपूर : कोरोना संशयितांना ठेवण्यासाठी आमदार निवास येथे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला असून येथील एक खोली दोन दिवसांपासून आतून बंद असल्याची बाब समोर आली. ही खोली कुणाला देण्यात आली याची नोंदच प्रशासनाकडे नसल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
   विदेशातून आलेले तसेच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांच्या संपर्कात असलेले, तबलिगी जमातशी संबंधित असलेल्या व्यक्तींना येथे ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आमदार निवासाची निवड करण्यात आली. त्यानंतर वनामती, रविभवन आणि इतर खाजगी संस्थांच्या इमारती विलगीकरण केंद्रासाठी घेण्यात आल्या. आमदार निवास येथे व्यवस्था चांगली नसल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती. येथे कोरोना संशयित असल्याने प्रत्येकाची नोंद असणे आवश्यक आहे.  येथील विंग क्रमांक  २ मधील एक खोली आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. या विंगमध्ये १५० खोल्या आहेत. कर्मचारी सफाई करण्यासाठी गेला असता त्याला ही बाब दिसून आली. सफाईसाठी दरवाजा ठोकला असता  कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब  वरिष्ठांना सांगताच  येथे चांगलीच धावपळ उडाली. ही खोली कुणाला देण्यात आली याची ही नोंद नसल्याचे सांगण्यात येते.

बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार
येथील जबाबदारी बांधकाम विभागाकडे आहे. येथे येणार्या सर्व लोकांची नोंद ठेवण्यासोबत आवश्यक सुविधा देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्याकडून नोंदच ठेवण्यात येत नसल्याचे समोर येत असून त्यांच्या भोंगळ कारभारामुळे मोठी घटना घडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com