
काटोल (जि. नागपूर) : २१ व्या शतकातील कौशल्य, नवनिर्मितीला चालना देण्यासाठी, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संवैधानिक मूल्ये अंगी जोपासणे, संभाषण कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशातून राज्यात तीनशे तर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात प्रत्येकी एक मॉडेल शाळा उभारणार निर्माण करण्यात येणार आहे. यात नागपूर जिल्ह्यात १३ शाळांचा समावेश असून आज (ता. ६) जि. प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळांची यादी निश्चित केली. याबाबत मार्च २०२० द्वितीय अर्थसंकल्पिय आधिवेशनात घोषणा करण्यात आली होती.
युडायस माहितीच्या आधारे गुणवत्ता, भौतिक सुविधेनुसार शाळेची निवड करण्यात आली. यावर कुणाचे आक्षेप असल्यास सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली होती. निवड झालेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, नव्याने आठवा वर्ग उघडणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय १३ निवडल्या आहेत.
यात काटोल (दुधाळा), नरखेड (अंबाडा सायवाडा) कुही (पाचखेडी), मौदा (चिरवा) नागपूर ग्रामीण (सोनेगाव बोरी), पारशिवनी (बनपुरी), रामटेक (भोंडेवाडा), सावनेर ( भेंडाळा), उमरेड (सिद्धेश्वर), भिवापूर (महालगाव), हिंगणा (गुमगाव), कळमेश्वर (तेल कामठी) कामठी (वरोडा) आदींचा समावेश आहे.
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उत्तम शैक्षणिक वातावरण निर्मिती, पाठ्यपुस्तकांपलीकडे जाऊन अध्यापन कार्य, वाचन सराव, भाषा, वाचन, लेखन, गणित अवगत करणे अनिवार्य राहील. स्वतंत्र ग्रंथालय गट अध्ययन पद्धतीने शैक्षणिक कार्यक्रमावर भर, रचनात्मक व आनंददायक शिक्षण, क्रीडा प्रकाराला प्राधान्य, स्वतंत्र शौचालय, आकर्षक इमारत, क्रीडांगण व क्रीडा साहित्य, आयसिटी व सायन्स लॅब आदी भौतिक सुविधायुक्त मॉडेल शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे.
मॉडेल शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी निवड झालेल्या शिक्षकांना पाच वर्षे एकाच शाळेत काम करावे लागणार आहे. विनंती अर्ज किंवा बदली होणार नाही. विद्यार्थ्याला शनिवारला दफ्तरापासून मुक्ती राहणार असून, अध्ययन कार्य चालणार आहे. विद्यार्थी स्वयंपूर्ण तयार झाल्यावर इतर शाळांना भेटी व अवगत कौशल्याचा इतरांना लाभ मिळवून प्रेरक ठरण्यास मॉडेल शाळा महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. इतर शाळासुद्धा त्यांच्यापासून बोध घेऊन नवनिर्मितीला हातभार लावण्यास मदत करतील, ही संकल्पना यातून सोडण्यास उपयुक्त ठरेल असे जाणकारांचे मत आहे.
महत्वाकांक्षी निर्णय
मॉडेल शाळांचा राज्य शासनाचा निर्णय अतिशय महत्वाकांक्षी असून, जि. प. शाळांना स्पर्धेत टिकण्याकरिता उपयुक्त ठरणार आहे. संपूर्ण संकल्पना अभ्यासपूर्ण असून, भविष्यात गरीब, होतकरू, सामान्य विद्यार्थी या सर्व सुविधेतून उत्तम घडतील. शाळांचा दर्जा सुधारेल.
दिनेश धवड, गटशिक्षणाधिकारी, पं.स. काटोल व नरखेड
संपादित ः अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.