esakal | झुम बराबर झुम..! या जिल्ह्यातून मद्य परवानासाठी सर्वाधिक अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

More than 80 thousand people appplied for online liquor permit within a week

गेल्या आठ दिवसात राज्यभरात 80 हजार 583 लोकांनी अर्ज केला. यातील 57 हजार 733 लोकांना परवाना देण्यात आला. यातून राज्य शासनाला 40 लाख 29 हजार 150 रुपये मिळाले. सर्वाधिक 14 लाख 52 हजारांचा महसूल नागपूर जिल्ह्यातून मिळाला. 

झुम बराबर झुम..! या जिल्ह्यातून मद्य परवानासाठी सर्वाधिक अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकारने मद्यविक्रीला परवानगी देताना फक्‍त परवानाधारकासच विक्री करण्याचे आदेश दिले. यामुळे परवाना काढण्यासाठी पिणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. मद्य परवानाकरता अर्ज करण्यात नागपूरकर सर्वाधिक आघाडीवर आहेत. गेल्या आठ दिवसात 29 हजार 40 लोकांनी ऑनलाईन अर्ज केले असून यातील 15 हजार 704 लोकांना परवाना देण्यात आला.

नागपुरात अवैधरित्या मद्य पिणाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईचा परिणाम म्हणून परवाधारकांची संख्या वाढत असल्याचे बोलल्या जात आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे फक्त 27 अर्ज आलेत. इतर जिल्ह्यातील ऑनलाईन प्रणाली फेल पडल्याचा परिणाम सांगण्यात येत आहे. 

ती गालातल्या गालात हसत वाट बघू लागली, पण कोणीच प्रतिसाद दिला नाही

कोरोनाच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या वेळी सर्व प्रकारचे मद्यविक्रीचे दुकान बंद करण्यात आले. जवळपास दोन महिने हे दुकान बंद राहिले. महसूल लक्षात घेता सरकारने मद्यविक्रीस परवानगी दिली. गर्दी टाळण्यासाठी शहरी भागात घरपोच देण्याचे आदेश दिले. तसेच परवानाधारकासच मद्यविक्री करण्याची अट घातली. यामुळे मद्य पिणाऱ्यांनी परवाना काढण्यासाठी धाव घेतली.

राज्यात सध्या 33 जिल्ह्यात मद्यविक्री सुरू आहे. सर्वाधिक 29 हजार 40 ऑनलाईन अर्ज नागपूर जिल्ह्यात आले. तर सर्वाधित कमी 27 अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. नागपूर पाठोपाठ मुंबईतून 9 हजार 33 तर ठाणेमधून 8 हजार 916 अर्ज आलेत. पुणे जिल्ह्यातून 2 हजार 82 अर्ज आले आहेत. 


फिजिकल डिस्टन्सिंगकरता ऑनलाईन सुविधा आवश्‍यक आहे. शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन प्रणालीवर भर देण्यात आला. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. घरपोच मद्यविक्रीबाबत अद्याप कुठलीच अडचण आली नाही. 
-प्रमोद सोनोने, अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, नागपूर