ती गालातल्या गालात हसत वाट बघू लागली, पण कोणीच प्रतिसाद दिला नाही

passengers gave no responce to st bus
passengers gave no responce to st bus

वरुड (जि. अमरावती) : गेल्या दोन महिन्यानंतर तिने आपली जागा सोडली. हळू हळू ती आली.. इकडे तिकडे बघून मोठा उसासा टाकीत उभी राहिली. हळूच गालातल्या गालात हसत वाट बघू लागली. तास, दीडतास, दोन तास झाले, तिच्याकडे कुणी फिरकलेच नाही, शेवटी एकाच जागी ताटकळत ती कंटाळली अन्‌ पुन्हा एक मोठा सुस्कारा टाकीत ती आल्या पावली परतली. वरुड आगारातील ही लालपरीची कहाणी प्रवासी नसल्याने आगाराबाहेर आलेली लालपरी पुन्हा स्थानबद्ध झाली.

दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर आजपासून लालपरी रस्त्यांवर धावण्यास सुरुवात झाली. वरुड बसस्थानकावरून सुद्धा प्रवाशांच्या सोयीसाठी बस सोडण्याची तयारी करण्यात आली. 16 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. बसस्थानकावर बस येण्यापूर्वी ती आगारातच सॅनिटाइझ करण्यात आली. बसच्या आतमध्येही फवारणी करण्यात आली. या गाड्यांकरिता 16 चालक व 16 वाहक सज्ज झाले होते. मोठ्या आनंदाने चालकांनी काही बसेस फलाटासमोर लावल्या.

प्रवाशांची वाट पाहात "लालपरी' आगारात स्थानबद्ध

वरुड वरून नांदगाव, शेंदुरजनाघाट, लोणी, हातुर्णा, पुसला, आमनेर आदी ठिकाणी या बसेस सोडण्यात येणार होत्या. त्यानुसार तयारी करण्यात आली होती. सकाळी सात वाजता पासून फलाटावर लालपरी प्रवाशांची वाट पाहात होती. मात्र प्रवासीच नसल्याने फलाटावर उभ्या केलेल्या काही बसेस हळूहळू आगारात परत नेण्यात आल्या. वरुड - लोणी ही बस विनाप्रवाशी सोडण्यात आली होती.

या बसस्थानकावरून विविध ठिकाणी प्रवास करण्याकरिता 16 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 86 फेऱ्यांचे नियोजन असून त्याद्वारे 2576 किमीचे अंतर सर्व फेऱ्या मिळून होणार आहे. सर्व बसेस पूर्णपणे सॅनिटाइझ करण्यात आल्या आहेत. तसेच चालक व वाहक यांना मास्कचे वाटप करून योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.
- जीवन वानखडे, आगार प्रमुख, वरुड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com