धुमाकूळ! `या` कार्यालयात अधिकाऱ्यांऐवजी दलालच जास्त

more brokers than officers in the land records office
more brokers than officers in the land records office

नागपूर : अत्यंत संवेदनशील आणि जमिनीसंदर्भातील महत्त्वाचे दस्तावेज सांभाळणारे व मालमत्ताधारकांच्या नावात फेरफार करण्याचे अधिकार असलेल्या सिटी सर्व्हे अर्थात भूमिअभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांऐवजी दलालच जास्त बसतात. अनेक अधिकाऱ्यांनी व्यवहारासाठी खाजगी पोट कर्मचारी नेमले असून कार्यालयात त्यांना  खुर्ची, टेबलची अधिकृत व्यवस्था करून दिली असल्याचे धक्कादायक चित्र या कार्यालयात बघायला मिळते. 

भूखंडाच्या खरेदी विक्रीनंतर संबंधित मालमत्ता धारकाच्या नावाची नोंद भूमि अभिलेख कार्यालयात केली जातो. या कार्यालयात असलेली नोंद महत्त्वाची समजले जाते. तुमच्याकडे रजिस्ट्री, मालमत्ता कर भरल्याच्या कितीही पावत्या असल्या तरी भूमि अभिलेखातील नोंद ग्राह्य धरल्या जाते. मुळ दस्तावेजावर वारसाचे नावे चढवण्याचे कामही येथेच होते. त्यामुळे हा विभाग ‘अतिशय हॉट' समजला जातो. येथे कुठलेच काम थेट होत नाही. कोणी विचारण्यास गेल्यास त्याला योग्य माहितीसुद्धा दिली जात नाही. दलालाशिवाय येथे फाईलच येऊ अशीच व्यवस्थाच  करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना फारसे कामच नसते. दलालांकडून आलेल्या फाईलवर डोळे झाकून स्वाक्षरी करणे एवढेच काम त्यांच्याकडे असते. त्यामुळे  भूमिमाफीयांचे चांगलेच फावत आहे. कोणाचाही भूखंड आपल्या नावावर करणे, नंतर न्यायालयातून आपणच कसे जमिनीचे मालक आहोत हे कागदोपत्री सिद्ध करण्यात या कार्यालयातील दलालांच्या मदतीने भूमिमाफियांना सोपे झाले आहे. 

तक्रार करुनही करवाई होत नाही
एखादे प्रकरण अंगलट आल्यास त्याची चौकशी होते. मात्र स्वाक्षरी करणारा अधिकारी सहीसलमात सुटतो. त्याच्यावर कुठलीच जबाबदारी निश्चित केली जात नसल्याने  येथील अधिकाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. दुसरीकडे दलाल अधिकृत कर्मचारी नसल्याने त्याच्यावर कारवाईचा प्रश्नच उद्‍वत नाही. त्याचे नाव, गावही कोणाला माहित नसते. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

कुठेतरी पाणी मुरते...
राजकुमार ढवळे पाटील या व्यक्तीने याचे मोबाईलने चित्रकरण करून थेट लाचलुचपत विभागाला ऑनलाई तक्रार केली आहे. कार्यालयात खुची-टेबल टाकून बसलेल्या दलालांचे फोटोही त्यांनी तक्रारीत जोडले आहेत. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची दखल घेऊन सर्व माहिती व पुरावे घेऊन तक्रारदारास बोलावले होते. मात्र त्यानंतर कुठेतरी पाणी मुरले आणि संपूर्ण प्रकरण थंडबस्तात पडले आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com