
कोरोनामुक्तांची संख्या ३६३ असून, यात शहरातील सुमारे ३१६ तर ग्रामीण भागातील ४७ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा १ लाख २ हजार ८७२ वर पोहचला. नागपूर जिल्ह्यात आता सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ९७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
नागपूर : पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधिताची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा कमी होताना दिसत होता. मात्र रविवारी (२९ नोव्हेंबर) कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक होती. नव्याने २८७ कोरोनाबाधितांची भर पडली असताना ३६३ जणांनी कोरोनावर मात केली. तर ९ जण कोरोनामुळे दगावले.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मेडिकल, मेयोसह एम्स व इतर खासगी अशा ११५ रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ७ हजारांवर पोहचली होती. मात्र, ४ नोव्हेंबरला मेडिकल, मेयो व एम्ससह खासगीत १०२० रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे कोरोना विषाणूबाबत जनमानसात असलेले भय जणू संपले होते, असे चित्र दिसत होते. मात्र अचानक १५ नोव्हेंबरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन
रविवारी १३३५ जणांवर रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. दहा दिवसांमध्ये साडेतीनशेवर रुग्ण उपचारासाठी दाखल केले. यामुळे प्रशासनाने पुन्हा चिंता व्यक्त केली होती. दरम्यान रविवारी ५ हजार १६१ चाचण्या झाल्या असून यापैकी २८७ जण बाधित आढळले. यामुळे बाधितांचा आतापर्यंतचा आकडा १ लाख ११ हजार ४७७ वर पोहचला आहे. बाधितांची संख्या कमी आढळली असली तरी मृत्यूमध्ये घट झाली नाही. आतापर्यंत ३ हजार ६५४ मृत्यूची नोंद झाली.
कोरोनामुक्तांची संख्या ३६३ असून, यात शहरातील सुमारे ३१६ तर ग्रामीण भागातील ४७ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा १ लाख २ हजार ८७२ वर पोहचला. नागपूर जिल्ह्यात आता सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ९७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना रुग्णालयात उपचार करण्यापेक्षा गृहविलगीकरणात राहून उपचार करणे रुग्णांनी पसंत केले. यामुळेच गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या ३ हजार ६४३ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. या रुग्णांवर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी देखरेख ठेवून आहेत.
क्लिक करा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
शनिवारी अहमदाबात व दिल्लीतून आलेल्या तीन विमानातील ७९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. या प्रवाशांचा तपासणी अहवाल आज आला. यात अकोला येथील रहिवासी एक प्रवासी पॉजिटिव्ह आढळून आला. त्यामुळे पॉजिटिव्ह आढळून आलेल्या विमानप्रवाशांची संख्या १८ वर पोहोचली. गुरुवारी १२ प्रवासी बाधित आढळले होते. गुरुवारी ८१ प्रवाशांची चाचणी करण्यात आली. यातील तीन प्रवाशांचा चाचणी अहवाल शुक्रवारी पॉजिटिव्ह आढळून आला. शुक्रवारी आलेल्या ५७ जणांची चाचणी करण्यात आली. यातील दोघांचा अहवाल, काल शनिवारी पॉजिटिव्ह आढळून आला.