बाहेर कोरोनाची भीती अन् घरात थांबलो तर यांची कटकट...काय करावे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शहरातील उच्चभ्रू वस्त्यांसोबतच झोपडपट्टी परिसरातही हा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये फवारणीसाठी मलेरिया-फायलेरिया विभागाकडे फॉगिंग मशीनची मागणी केली. मात्र, पेट्रोल-डिझेल नसल्याचे कारण पुढे करून विभागाने फॉगिंग मशीन देण्यास नकार दिला, ही गंभीर बाब असल्याचे सांगत संपूर्ण झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात, डास असलेली स्थानांवर औषध फवारणी करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आरोग्य विभाग (स्वच्छता) तसेच मलेरिया-फायलेरिया विभाग आणि झोन कार्यालयांना दिले आहेत. 

नागपूर : मागील काही दिवसात शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंगी, मलेरियाचेही संकट निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर तातडीने सर्व झोन कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्र परिसरात फवारणी (फॉगिंग) करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी उपायुक्त व आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांना दिले. 

शहरात "कोरोना'चा प्रसार वाढत असतानाच संपूर्ण आरोग्य यंत्रणा त्याचा प्रसार रोखण्यासाठी झटत आहे. याच दरम्यान शहरात डासांचाही प्रादुर्भाव वाढत असून यामुळे मलेरिया आणि इतर रोगांची शक्‍यताही बळावली आहे. "कोरोना'चे संकट डोक्‍यावर असतानाच केव्हाही येणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी डबकी साचतात. यामुळे मच्छरांची संख्या वाढते आहे. धंतोली, रामदासपेठ या भागात सर्वाधिक रुग्णालये आहेत. या भागालाही वाढत्या मच्छरांचा त्रास सतावित आहे. भांडेवाडी परिसरात डम्पिंग यार्ड असल्याने दुर्गंधीसोबतच मच्छरांचाही त्रास नागरिक सहन करीत आहे.

संकटकाळातही ते जपताहेत माणुसकीचा धर्म

शहरात फवारणी करण्याचे महापौरांचे निर्देश
शहरातील उच्चभ्रू वस्त्यांसोबतच झोपडपट्टी परिसरातही हा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये फवारणीसाठी मलेरिया-फायलेरिया विभागाकडे फॉगिंग मशीनची मागणी केली. मात्र, पेट्रोल-डिझेल नसल्याचे कारण पुढे करून विभागाने फॉगिंग मशीन देण्यास नकार दिला, ही गंभीर बाब असल्याचे सांगत संपूर्ण झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात, डास असलेली स्थानांवर औषध फवारणी करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आरोग्य विभाग (स्वच्छता) तसेच मलेरिया-फायलेरिया विभाग आणि झोन कार्यालयांना दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mosquito problem in nagpur