
नागपूर : ‘व्हॅलेंटाइन डे’ची युवावर्ग वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. नवीन जोडीदार शोधण्याचा अथवा असलेल्या जोडीदाराप्रती निष्ठा आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. प्रेमाची अनुभूती खूपच सुखद असते आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. या पध्दतींमधून फलनिष्पत्तीही होत असते. कारण, ‘व्हॅलेंटाइन वीक’ नंतर ४० आठवड्यांनी येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात अनेक घरांत पाळणा हलत असल्याचे दिसून आले आहे.
लग्नापूर्वी ‘व्हॅलेंटाइन वीक’मधील प्रेम लग्नानंतरही कायम असलेली अनेक जोडपी आहेत. किंबहुना ‘चुपके चुपके’ भेटणाऱ्यांपेक्षाही त्यांचे प्रेम आणखीच बहरते. थंडीच्या फेब्रुवारीत जोडीदारांना एकमेकांच्या प्रेमाची उब जाणवत नसेल तर आश्चर्यच. यातून नवे सृजन होते. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार बाळाच्या जन्मासाठी ३६ ते ४० आठवड्यांचा कालावधी लागतो.
व्हॅलेंटाइन विकनंतर ३८ ते ४० आठवड्यानंतर नोव्हेंबर महिना येत असून यात सर्वाधिक बालकांच्या जन्माची नोंद महापालिकेने केली आहे. २०१९ व २०२० या दोन्ही वर्षांत प्रत्येक महिन्यांत जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये अधिक बाळ जन्मल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी ४४ हजार ९७८ बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली.
या वर्षी नोव्हेंबरमध्ये ४ हजार ४७४ बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली. त्यापूर्वी २०१९ मध्ये ५३ हजार ९१२ बालकांचा जन्म झाला. नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ५ हजार ४२० आई-वडिलांनी बाळाच्या जन्माची नोंद केली. या दोन्ही वर्षात इतर महिन्यांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक बाळाच्या जन्माची नोंद करण्यात आली.
नोव्हेंबरवगळता इतर महिन्यांत ८० बाळांचा जन्म
तीन-चार वर्षांत नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक बाळांचा जन्म होत आहे. साधारणपणे नोव्हेंबरवगळता इतर महिन्यांत रुग्णालयात ८० बाळांचा जन्म होतो. परंतु नोव्हेंबरमध्ये ही संख्या शंभरावर होत आहे. यात फेब्रुवारीमध्ये गर्भधारणा लवकर होत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये जन्माचे प्रमाण अधिक आहे.
- डॉ. चैतन्य शेंबेकर,
स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ
जन्माची नोंद झालेल्या बाळांची संख्या
महिना | २०१९ | २०२० |
जानेवारी | ४,४१२ | ४,४३० |
फेब्रुवारी | ४,३०९ | ३,५६८ |
मार्च | ४,५१९ | ३,६५६ |
एप्रिल | ४,२४४ | ३,२०७ |
मे | ४,५०७ | ३,८४२ |
जून | ३,८६५ | ३,३८२ |
जुलै | ४,१५१ | ३,७७९ |
ऑगस्ट | ४,६६४ | २,८२० |
सप्टेंबर | ४,५३४ | ३,५५२ |
ऑक्टोबर | ४,७२२ | ४,३८२ |
नोव्हेंबर | ५,४२० | ४,४७४ |
डिसेंबर | ४,५६५ | ३,८८६ |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.