
नागपूर : कोरोनाच्या भितीने अनेकांनी शहर सोडले. जे राहिले त्यांना आता पोटपाण्याचा प्रश्न पडला आहे. त्यावर, शहरातील काही पाणीपुरीविक्री करणाऱ्या तरुणांनी भाजीपाला विक्रीचा पर्याय शोधला आहे. भाजीपाला हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये असल्याने विक्रीस बंदी नाही. परिणामी दररोज काम करून पोट भरणाऱ्या व्यावसायिकांनी आता दिवसभर शहरातील विविध भागांमध्ये भाजीपाला विक्रीच्या व्यवसायाला सुरूवात केली आहे.
लॉकडाऊन केल्यानंतर अनेकांचे व्यवसाय बंद झाले. याचा सर्वाधिक फटका हा दररोज काम करून पोट भरणाऱ्या व्यक्तींना बसला आहे. इतर राज्यातील अनेक नागरिकांकडून शहरामध्ये विविध व्यवसाय केले जातात. काहीजण आपआपल्या गावी निघून गेले. मात्र, जे राहिले त्यांनी आता पोट भरण्यासाठी भाजीपाला किंवा फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मुन्ना शेख म्हणाला, माझी डोसा गाडी आहे, पण सध्या बंद करावी लागली. गावी देखील जाता आले नाही म्हणून एका शेतकऱ्याकडून कलिंगड विकत घेतो आणि दिवसभर विकतो. माझे काही मित्र आहेत, ते देखील दुसऱ्या ठिकाणी भाजीपाला विकतात. पोलिसांकडून आम्हाला त्रास होत नाही, त्यांच्याकडून सहकार्य केले जाते. पहिले काही दिवस जेवणाची सोय आमच्या येथील एका व्यक्तीने केली. मात्र, आता आम्हाला आता पैसे मिळत असल्याने किराणा खरेदी करून खोलीवरच जेवण बनवत आहोत.
एक भाजीपाला विक्रेता म्हणाला, माझा पाणीपुरीची गाडी आहे. आता भाजीपाला एका व्यक्तीकडून खरेदी करतो आणि दिवसभर दुकानाच्या सावलीत बसून विकतो. थोडेफार पैसे मिळत आहेत. त्यामुळे, घराला हातभार मिळाला. असे अनेकजणांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय निवडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.