अरेरे... मुलासमोरच घेतला आईने गळफास

अरेरे... मुलासमोरच घेतला आईने गळफास
अरेरे... मुलासमोरच घेतला आईने गळफास
Updated on

नागपूर : कौटुंबिक कलहातून एका विवाहितेने तीन वर्षाच्या मुलासमोरच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना मानकापूर परिसरात उघडकीस आली. चंद्रकला चंदू सिरसाम (वय २६, भोले लेआउट, गोधनी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदू सिरसाम हे मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असून, कामाच्या शोधात ते नागपुरात आले होते. एका ठेकेदाराकडे चंदू यांना मिस्त्री म्हणून काम लागले. त्याचे सात वर्षांपूर्वी चंद्रकला हिच्याशी लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा (पाच वर्षे) हा मध्यप्रदेशात राहणाऱ्या आई-वडिलांकडे राहतो तर तीन वर्षाच्या मुलासह पती-पत्नी नागपुरात राहतात. गेल्या काही दिवसांपासून चंदू आणि चंद्रकला यांच्यात कौटुंबिक कलह सुरू होता. 

त्यामुळे घरातील वातावरण बिघडलेले होते. लहानसहान कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमकही उडायची. कधी कधी वाद विकोपाला जायचा. परंतु नवरा-बायकोच्या भांडणात कशाला पडायचे, या उद्देशाने शेजारी दुर्लक्ष करायचे.  नेहमाप्रमाणे चंदू शनिवारी सेंट्रिंगच्या कामावर निघून गेला. दुपारी चंद्रकलाचा भाऊ आला. तो थेट चंदूच्या कामावर पोहचला. चंदूने सायंकाळी लवकर घरी येत असून, स्वयंपाक करून ठेवण्यास फोनवरून पत्नीला सांगितले.

यादरम्यान चंद्रकला हिने सायंकाळच्या सुमारास स्वयंपाकखोलीत तीन वर्षाच्या मुलाला समोर ठेवले. सिलिंग फॅनला ओढनी बांधली. खुर्चीवर चढून गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी चंदू साळ्यासह घरी आला. त्याला घरातून रडण्याचा आवाज आला. दोघेही पळतच घरात गेले. त्यांना चंद्रकला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी मानकापूर पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
 

आई फासावर अन् मुलगा रडत


चंद्रकला हिने मुलासमोरच गळफास घेतला. काही क्षणातच तिचा जीव गेला. मुलगा आईचे पाय धरून रडत होता. जवळपास तासाभरानंतर मुलाचे वडील घरी आले. चिमुकल्यासमोरच आईने आत्महत्या केल्यामुळे परितरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादित : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com