esakal | हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

how to reduce pigmentation from the skin know remedies

अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण ता चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत. 

हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण ता चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत. 

वांग म्हणजे काय ?

ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते. आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात. 

अधिक माहितीसाठी - तोंडातून सतत येते दुर्गंधी? हे उपाय करा आणि रहा फ्रेश.. वाचा सविस्तर

हे आहेत घरघुती उपाय - 

लिंबू - 

वांगच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्चाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा. 

बटाटा -

एक कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित त्वचेवर लावा.  ते 10 मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करा. 

कोरफड -

चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. 

दही - 

एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील प्रभावित जागी लावा. 20 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या. जोपर्यंत ते सुकत नाही. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. 

केळ - 

केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. 

हे उपाय करा आणि आपला चेहरा फ्रेश आणि चमकदार बनवा. 

loading image