अडचणीतील महावितरणला ‘बुस्ट डोज’ 

योगेश बरवड
Tuesday, 22 September 2020

महावितरण ही वीजवितरण क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी शासकीय कंपनी आहे. २.६६ ग्राहक संख्या असणारी ही कंपनी लॉकडाउनच्या काळात अडचणीत आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी वीज देयकांची थकबाकी एकूण ५४ हजार ७१५ कोटींवर पोहोचली आहे. यामुळे अर्थिक गणितच विस्कटले आहे. या धक्क्यातून कंपनीला सावरण्यासाठी सर्व ५५ हजार कामगारांना योगदान द्यावे लागणार असल्याचे वर्कर्स फेडरेशनचे मत आहे.

नागपूर : अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरणला बुस्ट देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुढे सरसावली आहे. कंपनीच्या आंतर-बाह्य सुधारणेसाठी या संघटनेने आंतरिक सुधारणा कर्यक्रमाची घोषणा केली आहे. 

महावितरण ही वीजवितरण क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी शासकीय कंपनी आहे. २.६६ ग्राहक संख्या असणारी ही कंपनी लॉकडाउनच्या काळात अडचणीत आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी वीज देयकांची थकबाकी एकूण ५४ हजार ७१५ कोटींवर पोहोचली आहे. यामुळे अर्थिक गणितच विस्कटले आहे. या धक्क्यातून कंपनीला सावरण्यासाठी सर्व ५५ हजार कामगारांना योगदान द्यावे लागणार असल्याचे वर्कर्स फेडरेशनचे मत आहे.

पहाडी प्रज्ञावंत डॉ. भाऊ लोखंडे

फेडरेशनने स्वतःहून पुढाकार घेत आंतरिक सुधारणा कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यासंदर्भात व्यवस्थापनासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. कंपनीतील बिलींग विभागातील कर्मचारी, जनमित्रांसह सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिस्थिती हाताळण्याचा विश्वास संघटनेकडून देण्यात आला. थकबाकी वसुलीसह विस्कटलेल्या सर्वच बाबी सुरळीत करण्यासाठी सहकार्य करण्याची हमी संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली. उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्याध्यक्ष सी. एन. देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर, महेश जोतराव, अरूण म्हस्के यांचा समावेश असलेली समिती तयार करण्याता आली आहे. 

आंतरिक सुधारणा कार्यक्रम 
मिटर रिडींग, बिलींग, देयक वसुली, खंडित वीजग्राहकांकडून वसुलीचे कार्य सर्व कर्मचारी मिळून करतील. रिडिंगची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. यामुळे सर्व कर्मचारी अर्थिक आघाडीवर लक्ष घालतील. शहरातील वस्त्या, खेड्यापाड्यांमध्ये कनिष्ठ अभियंता, जनमित्र, सहायक, तंत्रज्ञांची चांगली प्रतिमा आहे. त्याचा उपयोग थकबाकी वसुलीसाठी होईल. 

बाह्य सुधारणा कार्यक्रम 
वीज बील, रिडींगसंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारींचे चर्चेतून निवारण केले जाईल. सोबत चहा घेऊन जनजागृतीसह बील भरण्याचे आवाहन केले जाईल. 

वीज खरेदीवर दरमहा ४ हजार कोटींचा खर्च 
महावितरणकडून दरमहा ४ हजार ५० कोटींची वीज खरेदी केली जाते. त्यापोटी दरमहा ५हजार ५०० कोटींची बिले ग्राहकांना पाठविली जातात. पण, पुर्ण वसुली होत नसल्याने थकबाकीचा ५४ हजाकर ७१५ कोटींचा डोंगर उभा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात ६ हजाकर ८९७ कोटींची देयके ग्राहकांना दिली गेली आहेत. 

महावितरण दृष्टीक्षेपात 
घरगुती ग्राहक २.०८ कोटी 
व्यवसायिक ग्राहक २० लाख ८ हजार 
लघुदाब औद्योगिक ग्राहक ४ लाख 
उच्चदाव औद्योगिक ग्राहक १४ हजार ५५७ 
पॉवरलूम ६० हजार 
उच्चदाब वाणिज्यिक ३ हजार २५० 
एकूण ग्राहक २ कोटी ३२ लाख ८५ हजार ८०७ 
कृषीग्राहक ४२ लाख १८ हजाकर ११२ 
थकबाकी ४० हजार ८९५ कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL gets 'boost dose'