
नागपूर : रायपूर विमानतळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमान येणार असल्याने मुंबई ते रायपूर विमान नागपुरात उतरविण्यात आले. तासभर विश्रांतीनगर विमानाने रायपूरकडे झेप घेतली.
अवश्य वाचा - मित्रांसह ती गेली ढाब्यावर; पार्टी ठरली शेवटची
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रायपूरला होते. त्यामुळे रायपूर विमानतळावर लॅंड होणारे अनेक विमाने इतरत्र वळविण्यात आले. मुंबई ते रायपूर 6ई-801 या क्रमांकाचे विमान सकाळी 11.46 वाजता नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. दुपारी 12.51 वाजता या विमानाने रायपूरकडे झेप घेतली. या विमानात 107 प्रवासी होते.
तत्पूर्वी, सकाळी नागपूरवरून बंगळुरूला सकाळी 6 वाजता झेप घेणारे गो एअरचे विमान साडेतीन तास विलंबाने झेपावले. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बंगळुरूला जाणारे विमान उशीरा झेपावल्याने पुढील विमानातून प्रवास अशक्य झाल्याचे नमुद करीत काही प्रवाशांनी संताप व्यक्त केला. पहाटे साडेचार वाजता शारजाहसाठी झेपावणारे एअर अरेबियाचे विमानही अडीच तास विलंबाने झेपावले.
सकाळी 7.50 वाजता हैदराबाकडे जाणारे विमान 9 वाजता झेपावले. हे विमान हैदराबादवरून विलंबाने आले होते. सायंकाळी 5 वाजता मुंबईला जाणारे विमानानेही तासभर विलंबाने झेप घेतली. गेल्या काही महिन्यांत विमाने उशीरा झेप घेत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.