esakal | जेलमधून बाहेर येताच गुन्हेगाराचा खून; नागपुरात गॅंगवार भडकण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

The murder of a criminal on his way out of prison Gangwar is likely to break out in Nagpur

कुख्यात नीलेशविरुद्ध यापूर्वीचे लुटमार, खून, खुनाचा प्रयत्न आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो कारागृहात होता. तीन दिवसांपूर्वीच शुक्रवारी तो जामिनावर कारागृहाबाहेर आला.

जेलमधून बाहेर येताच गुन्हेगाराचा खून; नागपुरात गॅंगवार भडकण्याची शक्यता

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : जामीनावर कारागृहाबाहेर येताच चार जणांनी कुख्यात गुंड व साथीदारावर हल्ला केला. यात कुख्यात गुंडाचा मृत्यू झाला असून साथीदार पळून गेल्याने बचावला. हे थरारक हत्याकांड सोमवारी रात्री सात वाजताच्या सुमारात खामला ते जयताळा मार्गावरील लंडन स्ट्रीटच्या खुल्या भागात घडला. नीलेश राजेश नायडू (वय ३१, रा. खामला) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रतीक सहारे असे जखमीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात नीलेशविरुद्ध यापूर्वीचे लुटमार, खून, खुनाचा प्रयत्न आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो कारागृहात होता. तीन दिवसांपूर्वीच शुक्रवारी तो जामिनावर कारागृहाबाहेर आला. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो लंडन स्ट्रीटच्या बाजूला आलेल्या मैदानात मित्र प्रतीकसह दारू पित बसला होता.

अधिक वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी

त्यावेळी चार युवत तेथे आले. त्यांच्याकडे चाकू व रॉड होता. दोघांनाही त्यांनी घेरले. दोघांवरही त्यांनी हल्ला केला. त्यावेळी प्रतीकच्या पायावर चाकू लागला. पण, तो लंगडत पळून गेला. आरोपींच्या हाती नीलेश लागला. नीलेशला घेरले व त्याच्यावर शस्त्रांनी वार केले. त्यानंतर दगडाने ठेचले. प्रतीक हा मदतीसाठी रस्त्यावर आला. त्याने पोलिसांना माहिती दिली.

सोनेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेले होते. मारेकरी कोण आहे, हे स्पष्ट झाले नाही. पण, गुन्हेगारी व वर्चस्वाच्या वादातूनच त्याचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिस वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींबाबत अद्याप कोणताही सुगावा लागला नाही.