esakal | धक्का दिल्याच्या कारणावरून केला खून, २० तासांत लावला छडा
sakal

बोलून बातमी शोधा

murder due to pushing three accused arrested

गेल्या सात नोव्हेंबरच्या रात्री इंदिरा माता नगरात एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. मृताची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांना तपासाचा धागा मिळत नव्हता.

धक्का दिल्याच्या कारणावरून केला खून, २० तासांत लावला छडा

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर  ः रस्त्याने जात असलेल्या दारुड्याने धक्का दिल्यामुळे तीन कुख्यात आरोपींनी दारुड्याचा दगडाने ठेचून खून केला. या हत्याकांडाचा एमआयडीसी पोलिसांनी २० तासांत छडा लावला. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. शुभम ऊर्फ निंबू गजानन निंबुळकर (२१, विजयनगर, पक्कीडे ले-आऊट), मंगेश भरत राय (२०,  वैशालीनगर, टॉवर लाईन) आणि आकाश माणिक शिंदे (रमाबाई आंबेडकर नगर, जयताळा) अशी आरोपींची नावे आहेत. तर सूरज (२५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात नोव्हेंबरच्या रात्री इंदिरा माता नगरात एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. मृताची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांना तपासाचा धागा मिळत नव्हता. पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. डीसीपी नरूल हसन यांनी हत्याकांडाच्या तपासासाठी पथक नेमले. पोलिसांनी २० तासांच्या आत हत्याकांडाचा छडा लावत तीनही आरोपींना अटक केली.
 

जाणून घ्या - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून
 

‘बर्थ डे’ पार्टीनंतर केला खून 

कुख्यात गुंड शुभम निंबुळकरच्या भावाचा शनिवारी वाढदिवस होता. शुभमने दारू पार्टी आयोजित केली होती. केक कापल्यानंतर आरोपींनी दारू ढोसली. त्यांतर शुभम, आकाश आणि मंगेश हे सिगरेट विकत घेण्यासाठी पानठेल्यावर जात होते. दरम्यान सूरज दारू पिऊन रस्त्याने जात होता. चालताना त्याचा धक्का शुभमला लागला. त्यामुळे दोघांत वाद झाला. तिघांनीही सूरजला मारहाण केली नंतर नाल्यात फेकले. त्याच्या अंगावर मोठमोठे दगड फेकून खून केला.

असा लागला छडा

शनिवारी बर्थडे पार्टी झाल्याची माहिती एमआयडीसी ठाण्याचे पोलिस अंमलदार मंगेश गवई, विनायक मुंडे, धर्मेंद्र यादव, विजय नेमाडे, बाळा साकोरे यांना मिळाली. पार्टीनंतर दारुड्यांनी कुणालातरी मारहाण केल्याचा धागा पोलिसांना मिळाला. त्यावरून पोलिसांना कुख्यात शुभमला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखवताच हत्याकांडाची कबुली दिली आणि अन्य दोन्ही आरोपींची नावे सांगितली. 

संपादन  : अतुल मांगे 

go to top