प्रेमाचा गेंम, सेंम टू सेम फेम दिघा आहे नागपूरकर... वाचा त्याचा प्रवास

मोहित खेडीकर
गुरुवार, 30 जानेवारी 2020

नागपूर : प्रेमाचा गेंम, सेंम टू सेम ही मालिका नुकतीच एका मराठी वाहिनीवर सुरू झाली आहे. जुळ्या मुलांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला दिघा अवघ्या काही दिवसांतच लोकप्रिय झाला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस ऊतरलेला दिघा विदर्भातील असून मूळचा नागपूरकर आहे, त्याचे खरे नाव आहे संचित चौधरी.

नागपूर : प्रेमाचा गेंम, सेंम टू सेम ही मालिका नुकतीच एका मराठी वाहिनीवर सुरू झाली आहे. जुळ्या मुलांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला दिघा अवघ्या काही दिवसांतच लोकप्रिय झाला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस ऊतरलेला दिघा विदर्भातील असून मूळचा नागपूरकर आहे, त्याचे खरे नाव आहे संचित चौधरी.

 

संचितचा नागपूर ते मुंबई प्रवास फारच रंजक आहे. सामान्य मध्यमवर्गीय युवक शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचा विचार करतात, मात्र संचितबाबत तसे घडले नाही. के. आर. पांडव कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने डीएड केले. लागलीच त्याला आदर्श विद्यामंदिर, गांधिबाग येथे शिक्षकाची नोकरी देखील मिळाली. दरम्यानच्या काळात त्याचे रंगभूमीवर काम करणे सुरू होते. संदीप दाबेराव यांच्या रंगरसिया थिएटरमध्ये तो भरपूर रमला होता. या काळात त्याने सापत्नेकरांचं मूल, इश्क के गळबळ जालें, पाणीपुरी, डॉकटर्स डेलिमा, सितारे मून वर,  ईस्टमन कलर, उजबक राजा 3 डकैत,  भगवत अज्जूकम, जस्ट ऍक्ट 363,  अंधेरी नगरी चौपट राजा आदी नाटकं त्याने आपल्या अभिनयाने गाजवली.

 

फार मोजक्या लोकांनाच वयात आल्याआल्या स्थिरस्थावर होण्याची संधी मिळते, त्यापैकीच संचित एक होता. शिक्षकाची नोकरी सुरू असताना अभिनय करण्याची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्याने सारेकाही सोडून मुंबई गाठायचे ठरवले.

२०१७ साली मुंबईला गेल्यावर संचितने स्वतःला कधीच मर्यादित ठेवले नाही. व्हॉईस ओवर आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट यासारखे मिळेल ते काम करण्याचा जणू सपाटाच त्याने लावला. यासोबच त्याने नामांकित पृथ्वी थिएटरसोबत देखील काम सुरू केले. येथेही त्याने मराठी भाषेचा आग्रह न धरता हिंदी व इंग्रजी भाषेतील नाटकांमध्ये काम केले.  

दरम्यान, मुख्य प्रवाहात काम मिळविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच होते. अखेर दहा वर्षांची रंगभूंमीवरची तपस्या कामी आली अन् प्रेमाचा गेंम, सेंम टू सेम या मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली.

- Uniion budget 2020 : महिला सुरक्षेसह आर्थिक सबलीकरणासाठी विशेष तरतूद असावी

आव्हानात्मक भूमिका : संचित चौधरी
जुळ्यांची भूमिका साकारताना भरपूर मेहनच घ्यावी लागत आहेत. दिघा कोल्हापूरचा असल्याने रांगडी भाषा बोलावी लागतेय तर डॉ. अरविंद मुंबईचा आहे. त्यामुळे भाषेचे आव्हान आहे. तसेच शुटिंग करताना दिवसातून किमान दहादा वेशभूषा बदलावी लागतेय. असे असले तरी भरपूर मेहनत करण्याची तयारी असल्याचे संचित म्हणाला.

भरपूर मेहनत घ्यावी
मला रंगभूमीने घडवले आहे. नागपूर तसेच विदर्भातून अनेक युवक कलाकार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मायानगरीत येतात. अशा सर्वांनी येथे येऊन मिळेल ते काम सुरू करावे व भरपूर मेहनत घ्यावी, असा आपुलकीचा सल्ला देखील संचितने दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur boy sanchit entered in marathi tv industry