हुश्‍श... ब्रॉडगेज प्रकल्प पूर्णत्वास, छिंदवाडा आले जवळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशव्यवापी लॉकडाऊनमुळे निरीक्षणाला उशीर होत आहे. ब्रॉडगेजमार्ग करण्यासह या मार्गावर विद्युतीकरनाचेही काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण करण्यात आला आहे. यात छिंदवाडा ते भंडारकुंड, इतवारी ते केळवद, केळवद ते भिमालगोंदीपर्यंत इलेक्‍टीफिकेशनचे काम पूर्ण झाले.

नागपूर : छिंदवाडा ब्रॉडगेज प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला आहे. लवकरच कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टीव्दारे (सीआरएस) निरीक्षण केले जाणार आहे. त्यांनी हिरवी झेंडी दाखवताच या मार्गावरून रेल्वेवाहतू सुरू होईल. या सेवेमुळे छिंदवाड्याला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ बराच कमी होणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. 

नागपूर - छिंदवाडा नॅरोगेज रेल्वेमार्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडणारा प्रमुख दुवा होता. या मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वेकडून ब्रॉडगेज प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. 2008 पासून प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ झाला. एकूण 1420.38 कोटींच्या या प्रकल्पाची लांबी 149 किमी आहे. मार्गावर 28 मोठे व307 लहान पूल असून 2 बोगदे आहेत. स्थानकांची एकूण संख्या 14 आहे. यापूर्वीच या मार्गाचे बरेचशे काम पूर्ण झाले असून रेल्वे वाहतूकही सुरू झाले आहे. केवळ भिमलगोंडी ते भंडारकुंड असे 20 किमी सेक्‍शनचेच काम शिल्लक होते. ते मे महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. 

हेडी वाचा : टापटीपमध्ये पतीने घराबाहेर पाऊल ठेवले, तोच पत्नी म्हणाली मला सारे माहिती आहे आणि...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशव्यवापी लॉकडाऊनमुळे निरीक्षणाला उशीर होत आहे. ब्रॉडगेजमार्ग करण्यासह या मार्गावर विद्युतीकरनाचेही काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण करण्यात आला आहे. यात छिंदवाडा ते भंडारकुंड, इतवारी ते केळवद, केळवद ते भिमालगोंदीपर्यंत इलेक्‍टीफिकेशनचे काम पूर्ण झाले.

या सेक्‍शनमध्ये पॅसेंजर गाड्यांसह मालगाड्या चालविण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत रेल्वेने अंतिम सेक्‍शन म्हणजेच भिमलगोंडी ते भंडारकुंडदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले आहे. नागपूर-छिंदवाडा नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये बदलण्यासाठी 1 डिसेंबर 2015 पासून यामार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. तत्पूर्वी 2005-06 मध्येच मंजुरी मिळाली होती. 2008 मध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. 10 वर्षांनंतर जानेवारी 2018 मध्ये भंडारकुंड -छिंदवाडा दरम्यान तसेच 23 फेब्रुवारी 2019 रोजी इतवारी ते केळवद दरम्यान रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur -chhindwara broadgauge project completed