"मैं तूम तिनों की वर्दी उतरवा दूंगा', चायनिज ठेलाचालकाची दादागिरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

सदर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एस. ई. नागरगोजे व त्यांचे सहकारी तेलंगखेडी भागात जनजागृती करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत होते. या कारवाईला विरोध करीत चायनिज विक्रेता दिनेश यादव याने नागरगोजे यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली.

नागपूर : "मैं तूम तिनों की वर्दी उतरवा दूंगा', अशी धमकी देत नागपुरातील एका चायनिज ठेलाचालकाने पोलिसांसमोर दादागिरी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

कोरोना पसरू नये यासाठी पोलिसांनी चहाठेले, पानठेले व चायनिज विक्रेत्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांना एका चायनिज विक्री करणाऱ्या ठेलाचालकाने धक्‍काबुक्‍की करीत मारहाण केली. कारवाई करणाऱ्या पोलिस पथकाला हुसकावून लावत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून चायनिज ठेलाचालक दिनेश बाबूलाल यादव (वय 30, रा. गोरेवाडा) असे ठेलाचालकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रार्दुभाव आणि फैलाव रोखण्यासाठी शहरातील पानठेले, चहाठेले, चायनिज विक्री ठेले तसेच अन्य टपऱ्या बंद करण्याची कारवाई पोलिस करीत आहेत.
 

चायनिज ठेलाचालकाची पोलिसांना मारहाण 
सदर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एस. ई. नागरगोजे व त्यांचे सहकारी तेलंगखेडी भागात जनजागृती करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत होते. या कारवाईला विरोध करीत चायनिज विक्रेता दिनेश यादव याने नागरगोजे यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. "मैं तूम तिनों की वर्दी उतरवा दूंगा' असे म्हणून मारहाण केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लगेच दिनेशला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. 

आणि तो झाला पोलिस निरीक्षक! शेतकरी पुत्राच्या जिद्दीची कहाणी

बजाजनगर, सीताबर्डी, सदर, धंतोली पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवरील किरकोळ विक्रेत्यांकडून चिरीमिरी घेऊन गाड्या रस्त्यावर लावण्यासाठी अभय देतात. अर्थपूर्ण संबंधांमुळेच रस्त्यावरील हातठेल्यांवर कारवाई केल्या जात नाही. याच कारणामुळे हातठेलेचालक पोलिसांवर भारी पडतात. त्यांना मारहाण करण्यापर्यंत हातठेलाचालकांची हिंमत होते. यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur chinees food seller threatened to police