rahul
rahul

आणि तो झाला पोलिस उपनिरीक्षक! शेतकरी पुत्राच्या जिद्दीची कहाणी

वणी : प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे, जिद्द, चिकाटी व परिश्रम केल्यास कोणतीही बाब कठीण नाही. हे वणी तालुक्‍यातील मोहुर्ली या गावातील एका शेतकरी पुत्राने हे सिद्ध करुन दाखवले. शिकवणी वर्ग न लावता स्वकर्तृत्वावर त्याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करीत पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले आहे.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आपला पाल्य या स्पर्धेच्या युगात टिकावा याकरीता पालक तत्पर असतात. त्यामुळेच महागड्या कोचिंग क्‍लासेसने डोके वर काढले आहे. पालक वाटेल तेवढे शुल्क देऊन आपल्या पाल्याला शिकवीत आहेत. परंतु वणी तालुक्‍यातील मोहुर्ली या गावात वास्तव्यास असलेले शेतकरी अशोक वरारकर यांच्या राहुल या मुलाने कुठल्याही शिकवणी शिवाय राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या दहशतीमुळे पुण्या मुंबईतील विद्यार्थ्यांची घरवापसी, पालकांचा जिवात जीव
राहुलचे प्राथमिक ते दहावी पर्यंतचे शिक्षण मोहुर्ली गावातच झाले. त्यानंतर वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातुन पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगून राहुलने अभ्यासाला सुरवात केली. कोणतेही कोचिंग क्‍लासेस न लावता राहुल वाचनालयात जाऊन अभ्यास करायचा. यापुर्वी त्याने राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र शारीरिक चाचणीत त्याला अपयश आल्याने पुन्हा नव्या जोमाने त्याने स्पर्धेची तयारी केली. प्रा. दिलीप मालेकार यांच्या मार्गदर्शनात शारीरिक चाचणीचे धडे घेतले. तसेच वैभव ठाकरे यांनी त्याला मार्गदर्शन केले. वणी पासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहुर्ली या खेडेगावातील राहुलने संपादित केलेले यश कौतुकांस पात्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com