कधी सुरू होणार नागपूरची आपली बस? जाणून घ्या प्रवासाच्या व्यवस्थेबाबत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

सोमवारपासून मुंबईत बेस्टची बससेवा सुरू झाली. याच धर्तीवर शहरात महापालिकेची परिवहन सेवा सुरू करून चाकरमान्यांना दिलासा देण्याची मागणी परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी आयुक्तांकडे केली. महापालिकेकडे 42, 32 आणि 22 आसनी बस आहेत.

नागपूर : शहरात दुकाने, खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये सुरू झाली असून चाकरमान्यांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असल्याने रस्त्यावर गर्दी वाढली आहे. आता नागरिकांना शहराच्या परिवहन सेवेची प्रतीक्षा असून मुंबईच्या धर्तीवर एक आसनावर एकच प्रवासी बसवून 'आपली बस' टप्प्या-टप्प्याने सुरू करावी, असे पत्र परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी आयुक्तांना दिले. त्यामुळे ऐरवी प्रवाशांच्या तुडूंब गर्दीतून प्रवासाऐवजी एका आसनावर एकटेच बसण्याचा नवा अनुभव येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गेल्या अडीच महिन्यांपासून महापालिकेची परिवहन सेवा बंद आहे. नुकताच दिलेल्या शिथिलतेच्या पार्श्‍वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बससेवा टप्या-टप्प्याने सुरू करण्याचे संकेत दिले होते. परंतु अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. सोमवारपासून मुंबईत बेस्टची बससेवा सुरू झाली. याच धर्तीवर शहरात महापालिकेची परिवहन सेवा सुरू करून चाकरमान्यांना दिलासा देण्याची मागणी परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी आयुक्तांकडे केली. महापालिकेकडे 42, 32 आणि 22 आसनी बस आहेत.

आता मुली देखील पॉर्न बघण्यात पुढे... नागपुरात तब्बल एवढे गुन्हे दाखल

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यापेक्षा निम्म्या लोकांना बसमध्ये प्रवेश द्यावा, अर्थात एका आसनावर एकच व्यक्ती बसेल, या व्यवस्थेसह बस सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय बसचे सॅनिटायझेशन, प्रत्येक फेरीनंतर आसनावर सॅनिटायझरची फवारणीही करावी, असेही बाल्या बोरकर यांनी 'सकाळ'ला सांगितले. शहर बस सुरू झाल्यास नागपूरकरांना एका आसनावर एकटेच बसण्याचा नवा अनुभव येणार आहे. 

बसमध्ये प्रवासासाठी या अटींची शक्‍यता 
- दररोज प्रत्येक बसमधील आसनांची फेरीनंतर स्वच्छता. 
- प्रवाशांना मास्क बंधनकारक 
- एका आसनावर एकच प्रवासी 
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur city bus to start soon