esakal | १३ दिवसांत कापले सहा हजार किमी अंतर; नागपूरचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांचा आगळावेगळा विक्रम

बोलून बातमी शोधा

Nagpur cyclist Dr Amit Samarths unique record}

डॉ. अमित यांनी मुंबई-चेन्नई-कोलकाता-मुंबई असा सुमारे सहा हजार किलोमीटरचा सुवर्ण चतुष्कोन निर्धारित १४ दिवसांच्या कालावधीपेक्षा एक दिवस आधीच पूर्ण केली. त्यांनी हे अंतर १३ दिवस, ९ तास आणि ५० मिनिटांत पार केले.

१३ दिवसांत कापले सहा हजार किमी अंतर; नागपूरचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांचा आगळावेगळा विक्रम
sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : नागपूरचे आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. त्यांनी रविवारी ‘राइड अक्रॉस इंडिया’ ही सहा हजार किलोमीटरचे अंतराची सायकल मोहीम अवघ्या १३ दिवसांत पूर्ण करून आगळ्यावेगळ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथून सुरू झालेल्या या मोहिमेचा शेवटही त्याच ठिकाणी झाला. या मोहिमेचा मुख्य उद्देश हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पासाठी निधी उभारणे होता. याद्वारे गोळा झालेला निधी लवकरच डॉ. आमटे यांच्या सुपूर्द करण्यात येणार आहे.

डॉ. अमित यांनी मुंबई-चेन्नई-कोलकाता-मुंबई असा सुमारे सहा हजार किलोमीटरचा सुवर्ण चतुष्कोन निर्धारित १४ दिवसांच्या कालावधीपेक्षा एक दिवस आधीच पूर्ण केली. त्यांनी हे अंतर १३ दिवस, ९ तास आणि ५० मिनिटांत पार केले.

अधिक वाचा - यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरू? पुसदचा बंगला केंद्रस्थानी; समाजमाध्यमातून चर्चेला उधाण

डॉ. समर्थ यांच्या क्रू मधील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ही मोहीम यापेक्षा आणखी कमी कालावधीत पूर्ण केली असती. मात्र, अनेक ठिकाणी खराब रस्ते, ट्राफिक जाम, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि दक्षिणेतील दमट व उष्ण हवामानामुळे त्यांना अधिक वेळ लागला. अमित यांनी दररोज ४५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापले. समर्थ यांच्यासोबत जितेंद्र नायक, विवित वाळवे, आनंद फिस्के, मुकुल समर्थ, राज महाडिक, शाकल शुक्ल, आरुषी नायक, रवींद्र परांजपे आदींचा समावेश होता.