तीन तासांचा पेपर दोन तासांत सोडवला अन् प्रियकरासोबत झाली फुर्रर्र..

girl_student_on_bike
girl_student_on_bike

नागपूर : एखादी प्रेयसी आपल्या प्रियकरासोबत पळाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या व वाचल्या आसतील. मात्र एक युवती थेट परीक्षा केंद्रावरूनच प्रियकरासोबत पळाल्याची घटना पुढे आली आहे. समाजशास्त्राच्या पेपरला वडिलांनी दुचाकीने परीक्षा केंद्रावर सोडून दिले. मात्र, पेपर तासभर अगोदर देऊन विद्यार्थिनीने प्रियकरासोबत पळ काढला. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपी प्रियकराविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली परिसरात राहणारी 17 वर्षीय मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. सोमवारी तिचा समाजशास्त्र विषयाचा पेपर होता. त्यामुळे पेपरच्या वेळेवर तिच्या वडीलांनी दुचाकीने परीक्षा केंद्रावर सोडून दिले होते. परंतु, तीन तासांनंतर वडील पुन्हा मुलीला घ्यायला आले असता ती आढळून आली नाही. तिचा शोध घेतला असता तासभर अगोदर पेपर परत केल्याची माहिती समोर आली. ती एका युवकासोबत दुचाकीवर बसून गेल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांनी दिली.

प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल 
त्यामुळे ती प्रियकरासोबत पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला असून या प्रकरणी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिचे लास्ट कॉल, लोकेशन आणि मित्र-मैत्रिणीशी संपर्क करून विद्यार्थिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com