तो रोज घेत होता विवाहितेच्या चारित्र्यावर संशय.. मग एकेदिवशी पत्नीने केले असे...

अनिल कांबळे
शनिवार, 27 जून 2020

पतीसह सासू-सासरेसुद्धा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. त्यामुळे रोजच्या कटकटीला कंटाळून विवाहितेने निर्णय घेतला आणि गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कपिलनगर येथे नुकतीच उघडकीस आली.

नागपूर : पती व सासरच्या मंडळींनी वारंवार चारित्र्यावर संशय घेतल्याने या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी चौकशी करून पती, सासू व सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सायली विलास निकोसे (वय 28) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती विलास भीमराव निकोसे, सासू सविता भीमराव निकोसे आणि सासरे भीमराव निकोसे (सर्व रा. डोरली, ता. पारशिवनी) अशी आरोपींची नावे आहेत.

 

सायली आणि विलास यांचे 2 एप्रिल 2017 ला लग्न झाले होते. लग्नानंतर चारच महिन्यांत पती विलासने तिच्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. त्यामुळे तिला मोबाईलवर बोलू न देणे, तिला घराबाहेर निघू न देणे तसेच तिच्यावर अनेक बंधने घालण्यात आली होती.

 

सासू-साऱ्याने मारले टोमणे

"तुझे कुण्यातरी युवकाशी प्रेमसंबंध आहेत' असा आरोप पती विलास सायलीवर करीत होता. त्यानंतर विलासने आपल्या आईवडिलांनाही सायलीचे इतर युवकाशी प्रेमसंबंध असल्याचे पटवून दिले. त्यामुळे सासू-सासरेसुद्धा वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तिला रोज "काय म्हणतो तुझा प्रियकर, प्रियकराशी बोलणे झाले काय?, आला होता का तो भेटायला? असे टोमणे मारणे सुरू केले.

हेही वाचा : हिमतीची दाद... मणक्‍यात घुसला होता चाकू अन्‌ युवक होता मोबाईलमध्ये गुंग

दररोजचा जाच असह्य

दररोजच्या जाचाला कंटाळून ती एक दिवस माहेरी परतली व 15 जूनला सायंकाळी 5.23 वाजता गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. तिची बहीण आरती वीरेंद्र मेंढे (27) रा. कपिलनगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagpur, a married woman committed suicide after being harassed by her father-in-law

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: