नागपूरच्या महापौरांनी दिले हे आदेश, शिक्षक संघासोबत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

नागपूर : महापालिकेच्या शिक्षकांना 84 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी अठरा हप्ते पाडून जानेवारी महिन्याच्या पगारापासून देण्याचे निर्देश, महापौर संदीप जोशी यांनी अधिकाऱ्यांना आज दिले.

महानगरपालिका शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष राजेश गवरे यांच्या नेतृत्वात महापौरांसोबत शिक्षक व शाळांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्षनेता संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी श्री. मिश्रिकोटकर आदी उपस्थित होते. यावेळी सातव्या वेतन आयोगाकरिता सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन महापौरांनी संघटनेला दिले.

सहाय्यक शिक्षणाधिकारी, शाळा निरीक्षक, क्रीडाधिकारी यांची रिक्त असलेली पदे भरावीत, निवडश्रेणीबाबत शिक्षण उपसंचालकांशी चर्चा करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, शहराचा विस्तार बघता नवीन शाळा उघडण्याकरिता वस्त्यांची पाहणी करून प्रस्ताव सादर करावे, जीपीएफच्या पावत्या देण्याकरिता 52 कोटींची तरतूद करावी, सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत शालार्थ प्रणाली समाविष्ट असणाऱ्या शिक्षकांना 50 टक्के थकबाकी मिळण्याकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि सात दिवसांच्या आत प्रस्ताव पाठवा, असे निर्देशही महापौरांनी दिले.
 
- पालकांनो सांभाळा आपल्या मुलांना! अन्यथा...
 
महापालिकेच्या शाळांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्पात शिक्षणाकरिता एकूण तरतुदीच्या चार टक्के राखीव ठेवण्यात येतील, असे आश्‍वासनही महापौरांनी दिले.
यावेळी राजेश गवरे यांच्यासह सचिव देवराव मांडवकर, आनंद नागदिवे, राकेश दप्पलवार, तेजूषा नाखले, अरविंद आवारी, गीता विष्णू, दीपक सातपुते, नूतन चोपडे, विनायक कुथे, मधुकर भोयर, माला कामडे, विकास कामडी, अशोक बालपांडे, कल्पना महल्ले, सुभाष उपासे, रामराव बावणे, नुसरत खालिद, परवीन सिद्दीकी, सुभाष उपासे, प्रभू चरडे, काजी नरूल लतिफ, सिंधू तागडे, मलका मुनीर अली, माया गेडाम, विनय बरडे, ज्योती खोब्रागडे, गजानन सेलोरे, विजया ठाकरे, मनोज बारसागडे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur mayor order about teachers salary