नागपूरकरांनो, ॲम्बुलन्स, बेड हवे असल्यास झोनमध्ये करा फोन; हे आहेत कंट्रोल रूमचे फोन नंबर 

राजेश प्रायकर 
Tuesday, 8 September 2020

कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी दहा झोनच्या सहाय्यक आयुक्तांना नोडल ऑफिसर नियुक्त करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले.

नागपूर : कोरोनावर नियंत्रणासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असून आता दहाही झोनमध्ये कोविड कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले. दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना कंट्रोल रूमचे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कोरोनाबाधित तसेच नागरिकांना ॲम्बुलन्स, बेडसाठी कंट्रोल रुममध्ये फोन करता येणार आहे.

कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी दहा झोनच्या सहाय्यक आयुक्तांना नोडल ऑफिसर नियुक्त करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...

त्यानुसार दहाही झोनच्या सहायक आयुक्तांसाठी आदेश काढण्यात आले. दहा झोनच्या सहाय्यक आयुक्तांना कोरोना रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, कोरोना चाचणी केन्द्र स्थापित करून मोठ्या प्रमाणात चाचण्या करणे, चाचणी केंद्राचे दैनंदिन व्यवस्थापन करणे, खाजगी रुग्णालयातील बेड व्यवस्थापन करणे, रुग्णवाहिका व शववाहिकेचे व्यवस्थापन करणे, मृत कोरोना रुग्णांचे डेथ अॅनालिसीस करणे, प्रतिबंधित क्षेत्रातील आनुषंगिक कार्यवाही करणे तसेच परिसर निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 या सहाय्यक आयुक्तांना मनुष्यबळ अधिग्रहित करणे, आवश्यक कामकाज सोपविण्याचे आयुक्तांना असलेले अधिकारही प्रदान करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना विषयक बाबीसंदर्भात झोन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन यांनी केले आहे.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

झोन व नागरिकांसाठी उपलब्ध फोन क्रमांक

झोन फोन क्रमांक
लक्ष्मीनगर ०७१२-२२४५०५३
धरमपेठ ०७१२-२७५५५८९
हनुमाननगर ०७१२-२७५५५८९
धंतोली ०७१२-२४६५५९९
नेहरुनगर ०७१२-२७०२१२६
गांधीबाग ०७१२-२७३९८३२
सतरंजीपूरा मो.नं. ७०३०५७७६५०
लकडगंज ०७१२-२७३७५९९
आशीनगर ०७१२-२६५५६०५
मंगळवारी ०७१२-२५९९९०५ 
   

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur MNC open zone wise corona control rooms