नागपूर मनपा पीओपी मुर्ती विक्रेत्यांवर कार्यवाही करणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

लॉकडाउनमुळे आधीच पारंपरिक मूर्तिकार आर्थिक संकटात आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव व दीपावली या उत्सवावरच मूर्तिकारांचे कुटुंबाचे वर्षभराचे उदर निर्वाह अवलंबून आहे. मात्र, पीओपी मूर्तीमुळे पारंपरिक मूर्तिकारांचा व्यवसायच धोक्यात आला आहे.

नागपूर : गणेशोत्सवाच्या दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीची विक्री करणाऱ्यांवर महापालिका जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेसुनार कार्यवाही करणार, असे आश्‍वासन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीराम जोशी यांनी दिले. विविध मागण्यांसदर्भात प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती विरोधी कृती समितीने त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यादरम्यान, समितीला त्यांनी आश्‍वासन दिले.

यावेळी समितीचे मुख्य संयोजक सुरेश पाठक यांच्या नेतृत्वामध्ये अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार, पीओपी मूर्तीवर बंदी संदर्भात 8 मे 2015 रोजी महापालिकेच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाने मंजूरी दिली होती. पीओपीच्या मुर्त्या पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक असून या अधिसुचनेसुनार कार्यवाही करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली. तसेच, मूर्तिकार, विक्रेते, बाजार व विक्री व्यवस्था विषयी आणि सार्वजनिक गणेश मंडळ व स्थापित होणाऱ्या गणेश मूर्तीची उंची विषयी महापालिकेने दिशानिर्देश जाहीर करावे, अशा विविध मागण्या चर्चेदरम्यान करण्यात आल्या.

वाचा- तुकाराम मुंढेंनी करून दाखवलं, 45 दिवसांत नागरिकांसाठी केली ही आवश्‍यक सुविधा

दिशानिर्देश जारी करू
कोरोना संक्रमणात प्रशासन पर्यावरण प्रदूषणा विषयी गंभीर असल्यामूळे महापालिका अधिसूचनेनुसार पीओपी मूर्त्यावर कार्यवाही करणारच आहे. वैयक्तिक उत्सवा व्यतिरिक्त सार्वजनिक गणेश मंडळाचे निवेदन राज्यशासनास पाठविले आहे. शासनाच्या आदेशानुसार दिशानिर्देश जाहीर करण्यात येतील.
-श्रीराम जोशी, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur MNC will act against POP Sculptor