माझ्या आईने जन्म होताच मला झुडपात फेकले... सांगा, माझी काय चूक? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसआरपीएफ कॅम्पमागे ज्ञानदीपनगरात रेणुका अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये आशिष गहाणे (वय 27) हा चौकीदारी करतो. बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तो फिरत होता. दरम्यान, त्याला अपार्टमेंटला लागून असलेल्या झुडपात कपड्यात काहीतरी गुंडाळलेले दिसले. उत्सूकतेपोटी आशिषने जवळ जाऊन पाहिले असता त्याला नवजात अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसले. त्याने पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली.

नागपूर : अनैतिक संबंधातून राहिलेल्या गर्भामुळे जन्मास आलेल्या बाळाला एका निष्ठूर मातेने जन्म होताच झुडपात फेकले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी बाळाला सोडून पलायन करणाऱ्या आईविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसआरपीएफ कॅम्पमागे ज्ञानदीपनगरात रेणुका अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये आशिष गहाणे (वय 27) हा चौकीदारी करतो. बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तो फिरत होता. दरम्यान, त्याला अपार्टमेंटला लागून असलेल्या झुडपात कपड्यात काहीतरी गुंडाळलेले दिसले. उत्सूकतेपोटी आशिषने जवळ जाऊन पाहिले असता त्याला नवजात अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसले. त्याने पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली.

निष्ठूर आईविरूद्ध गुन्हा दाखल
वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत खराबे यांनी लगेच एएसआय दत्ता काळे यांच्या पथकाला घटनास्थळावर पोहचले असता त्या मृत अर्भकाला बघण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दीला पांगवित मृत अर्भकास ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात रवाना केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा दाखल करून त्या मातेचा शोध घेणे सुरू केले आहे. 

अशीही चर्चा
एमआयडीसी परिसरातील एका युवतीने हे नवजात अर्भक फेकले असून तिला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाली होती. अपत्याचा जन्म झाल्याबरोबरच त्या युवतीच्या नातेवाईकांनी हे अपत्य अपार्टमेंटच्या लगत असलेल्या झुडूपात बाळाला फेकून पळ काढला, अशी कुजबूज परिसरातील नागरिकांत सुरू होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

अल्पवयीन मुलीचे चार वर्षे केले शोषण अन् ती झाली गर्भवती...
 

सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार 
झुडपात फेकलेल्या बाळाचा जन्म जवळपास 12 ते 16 तासांपूर्वी झाला असावा. त्यामुळे भूकेने त्याचा मृत्यू झाला असावा. अद्याप बाळाच्या माता-पित्याबाबत माहिती मिळाली नव्हती. परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिस पथक करीत आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे कुणी बाहेर नसल्याचा फायदा घेऊन बाळाला फेकल्याचा संशय आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur mother left newborn baby