esakal | बापरे! दरोडा आणि लूटमार करण्यासाठी 'ते' करायचे तब्बल ११५ किमीचा प्रवास; पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

बोलून बातमी शोधा

Nagpur police caught criminals who looted people }

खापरी येथील नवीन पुनर्वसन येथे राहणारे जितेंद्र बाबुलाल मलिक (३५) हे एम्समध्ये हाऊस किपिंगचे काम करतात. २ मार्च रोजी मध्यरात्री मलिक हे ड्युटीवरून घरी येत होते

बापरे! दरोडा आणि लूटमार करण्यासाठी 'ते' करायचे तब्बल ११५ किमीचा प्रवास; पोलिसांनी आवळल्या मुसक्या 
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः नागपुरात रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करायची आणि लुटीचा माल घेऊन पुलगावला पळून जायचे, असा प्रकार करणाऱ्या टोळीला उपायुक्तांच्या सायबर विभागाच्या मदतीने बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. टोळीकडून ४ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. प्रणय संजय ठाकरे (२०, खामला जुनी वस्ती), रोहित रविदास डोंगरे (२०, देवनगर) आणि दिनेश इंद्रपाल निंबोने (२५, प्रतापनगर) अशी अटकेतील टोळीचे नाव आहे. 

खापरी येथील नवीन पुनर्वसन येथे राहणारे जितेंद्र बाबुलाल मलिक (३५) हे एम्समध्ये हाऊस किपिंगचे काम करतात. २ मार्च रोजी मध्यरात्री मलिक हे ड्युटीवरून घरी येत होते. रस्त्याने येत असताना अचानक त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे दुचाकी ढकलत ते घरी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून तीन लुटारू आहे. लुटारूंनी मलिक यांना लिफ्ट देऊन त्यांच्या दुचाकीला टोचन लावून खापरी येथील पेट्रोलपंपावर नेले. 

धक्कादायक! सेवानिवृत्त आर्मी जवानाच्या घरावर छापा; जीवंत काडतुससह मोठा शस्त्रसाठा...

पेट्रोलपंपावर लुटारूंनी मलिकच्या दुचाकीत पेट्रोल भरले. मलिकने पैसे देऊन दुचाकी मागितली असता लुटारूंनी त्यांना हातबुक्कीने मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून त्यांची दुचाकी, मोबाईल, रोख ६ हजार  रुपये इतर कागदपत्रे असा ३८ हजाराचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

डीसीपी डॉ. अक्षय शिंदे यांच्या सायबर क्राईम पथकातील दीपक तऱ्हेकर आणि मिथून नाईक यांनी तांत्रिकदृष्ट्या मदत केली. लुटारू हे वर्धेकडे पळून गेल्याचे लक्षात आले. पोलिसांचे एक पथक लगेच वर्धेला रवाना झाले. पोलिसांनी पुलगाव येथून तीनही आरोपींना आणि त्यांच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले. या लुटारूंनी सोनेगाव, प्रतापनगर, तहसील आणि बेलतरोडी येथून २ दुचाकी अशा ५ दुचाकी लुटल्या होत्या. लुटारूंजवळून पाच दुचाकी आणि ९ मोबाईल असा ४ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

अबब..! १० हजारांत पाच लाखांचे कर्ज; पोलिसांनी आयोजकांना घेतले ताब्यात

दारू आणि प्रेयसीवर उडवाये पैसे

मुख्य आरोपी प्रणव ठाकरे याचे पुलगाव येथे ओळखीचे मित्र आहेत. नागपुरात लुटपाट केल्यानंतर ते पुलगावला पळून जायचे. पुलगाव येथे मालाची विल्हेवाट लावल्यानंतर आलेल्या पैशातून मौजमजा करायचे. पैसे संपले की, पुन्हा नागपुरात येऊन लुटमार करायचे. लुटारू बाहेरगावी राहत असल्याने त्यांचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे त्यांचे फावत होते. मात्र या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

संपादन - अथर्व महांकाळ