मरकजमधून परतलेल्यांना नागपूर पोलिस आयुक्‍तांनी दिला हा ईशारा 

bhushan kumar upadhyaya
bhushan kumar upadhyaya

नागपूर : दिल्ली निजामुद्दीन येथील मरकज संमेलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुढे यायला हवे. जे नागरिक स्वत:हून पुढे येणार नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला.

पोलिस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दिल्लीतील निजामुद्दीन येथे आयोजित मरकज संमेलनास उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करणे अत्यावश्‍यक आहे. त्याकरिता नागपूर शहरात विलगीकरण केंद्राच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी स्वतःहून माहिती देणे बंधनकारक आहे.

अद्याप माहिती न दिलेल्या नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षास संपर्क करावा. जे नागरिक माहिती देणार नाही, त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. माहितीसाठी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन कोरोना नियंत्रण कक्ष 0712/2562668 या क्रमांक व मनपाचा 0712/2567021 तसेच नागपूर शहर पोलिस नियंत्रण कक्षाचा 0712/2561222, 100 या क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. 

विदर्भात 36 रुग्ण
विदर्भात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 36 झाली आहे. मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील तीन रुग्णांसह अकोला जिल्ह्यातील एक रुग्ण बाधित आढळला. आज तपासण्यात आलेल्या विदर्भातील 128 नमुन्यांमधून 124 नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागपूरच्या एम्स व मेयो प्रयोगशाळेत तपासणीसाठी आले होते. यात अकोला जिल्ह्यातील एक 60 वर्षीय पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. अमरावती जिल्ह्यात 49 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिलेसह तीन रुग्ण आहेत. विदर्भात नागपुरात 19 रुग्ण एक मृत्यू, बुलडाण्यात 11 रुग्ण व एक मृत्यू, गोंदिया एक रुग्ण, वाशीममध्ये एक मृत्यू, अमरावतीमध्ये चार रुग्ण व एक मृत्यू व अकोल्यात एक रुग्ण असे एकूण 37 रुग्ण व चार मृत्यूची नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com