esakal | कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या विद्यार्थिनी लढत आहेत घरमालकांशी, असा दिला जातोय त्रास...

बोलून बातमी शोधा

Amravati students suffer from homeownership

"त्या कोरोनाबाधित भागातून आल्या असून, त्यांच्यापासून धोका आहे', अशी कारणे समोर केले जात आहे. सॅनिटाइज आहात का?, निर्जंतुक करून घेतले आहे का?, तुमच्यापासून आम्हाला बाधा तर होणार नाही ना?, असे नानाविध प्रश्‍न उपस्थित करून या विद्यार्थिनींना त्रस्त केले जात आहे. त्यांनी घर खाली करावे यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. 

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या विद्यार्थिनी लढत आहेत घरमालकांशी, असा दिला जातोय त्रास...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासोबत सहकार्य करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थिनी घरमालकांच्या त्रासापायी त्रस्त झाल्या आहेत. त्यांच्यावर लॉकडाऊन व संचारबंदी सुरू असताना घर सोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या या काळात भाडेकरूंना राहू देणे व भाड्यासाठी तगादा न लावण्याच्या सूचना असताना विद्यार्थिनींवर दबाव येत असल्याने त्या त्रस्त झाल्या आहेत. 

विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयातील वैद्यकीय शाखेच्या काही विद्यार्थिनी महापालिकेच्या आरोग्य तपासणी व सर्वेक्षण पथकांत सहभागी झाल्या आहेत. यातील काही विद्यार्थिनी बाहेरगावच्या असून, त्या महाविद्यालय परिसरानजीकच्या भागात भाड्याने राहतात. शहरातील संवेदनशील भागात त्यांचे आरोग्य सर्वेक्षण व तपासणी सुरू आहे. सकाळी आरोग्य तपासणी व सर्वेक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनी घरी परतल्यावर घरमालकांकडून त्यांच्यावर घर सोडण्यासाठी दबाव सुरू होतो.

हेही वाचा - बापलेकीच्या पवित्र नात्यालाच त्याने फासला काळिमा...केले हे कृत्य

"त्या कोरोनाबाधित भागातून आल्या असून, त्यांच्यापासून धोका आहे', अशी कारणे समोर केले जात आहे. सॅनिटाइज आहात का?, निर्जंतुक करून घेतले आहे का?, तुमच्यापासून आम्हाला बाधा तर होणार नाही ना?, असे नानाविध प्रश्‍न उपस्थित करून या विद्यार्थिनींना त्रस्त केले जात आहे. त्यांनी घर खाली करावे यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. 

राज्य सरकारने घरमालकांना लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात भाडेकरूंना भाड्यासाठी तगादा न लावण्याच्या व घर सोडण्यास बाध्य करू नये अशा सूचना दिल्या आहेत. त्याचे अमरावती महापालिकेच्या क्षेत्रात काही घरमालकांकडून सर्रास उल्लंघन होऊ लागले आहे. मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात लक्ष घालून चिंतामुक्त करावे, अशी विनंती विद्यार्थिनींनी केली आहे.

आयुक्तांकडे तक्रार 

आरोग्य पथकातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची तक्रार आयुक्तांच्या कानावर टाकण्यात आली आहे. त्यांनी घरमालकांचे उद्‌बोधन करावे, अशी विनंती केली आहे. परिस्थिती निवळल्यावर त्यांची अन्य ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करू, असे महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांनी सांगितले.