esakal | दोन वेळच्या जेवणाची सोय कराची की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भराचे? विद्यापीठाला केली ही मागणी...
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur university admission fees should be reduced

टाळेबंदीचा फटका येणाऱ्या दिवसांत सर्व सामान्य कुटुंबावर दिसून येणार आहे. अशा परिस्थितीत शुल्क भरणे दूरच पण जीवन जगणे कठीण होणार आहे. त्यामुळे विद्यापीठांसारख्या शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्थरावर विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे.

दोन वेळच्या जेवणाची सोय कराची की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भराचे? विद्यापीठाला केली ही मागणी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमुळे दोन वेळच्या जेवणाची सोय करावी की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे असा यक्षप्रश्‍न पालकांसमोर पडला आहे. येणाऱ्या काळात ही परिस्थिती अधिक भीषण होणार आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कामध्ये 50 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.

टाळेबंदीचा फटका येणाऱ्या दिवसांत सर्व सामान्य कुटुंबावर दिसून येणार आहे. अशा परिस्थितीत शुल्क भरणे दूरच पण जीवन जगणे कठीण होणार आहे. त्यामुळे विद्यापीठांसारख्या शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्थरावर विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मानव्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचे शुल्क कमी असले तरी अन्य अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मोठी रक्कम मोजावी लागते. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क हे 25 ते 50 हजारांच्या घरात आहे. हे शुल्क जमा करणे विद्यार्थ्यांना कठीण होणार आहे. दोन दिवसांपूर्वी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात पन्नास आणि शंभर टक्के सवलत देण्याची घोषणा केली. आता नागपूर विद्यापीठानेही शैक्षणिक शुल्कात कपात करावी, अशी मागणी होत आहे.

अवश्य वाचा- देव ते अंतरात नांदतीश्रमिक हो घ्या इथे विश्रांती..

यासंदर्भात नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनतर्फे (नुटा) व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कोंगरे, सिनेट सदस्य डॉ. अजित जाचक आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे रुद्र धाकडे यांनी कुलगुरूंना निवेदन सादर केले आहे.

शुल्कवाढ करू नका

कोरोनामुळे अनेक कुटुंबांचे रोजगार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या आर्थिक संकटाचा विचार करता कुठल्याही प्रकारची शुल्क वाढ न करता विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत द्यावी, अशा मागणीचे निवेदन नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनच्या (नुटा) वतीने कुलगुरूंना दिले आले.