वर्षभरानंतरही गृहमंत्र्यांच्याच तक्रारीची घेतली नाही दखल, चौकशीस टाळाटाळ

nagpur water resources department not taking home minister order seriously
nagpur water resources department not taking home minister order seriously

नागपूर : जलसंधारणाची कामे दर्जेदार नसल्याची तक्रार करून त्याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. वर्षभरानंतरही विभागाकडून चौकशीच करण्यात आली नाही. गृहमंत्र्याच्या तक्रारीची दखल होत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय, असाल सवाल उपस्थित होत आहे. 

जलसंधारण विभागाकडून करण्यात आलेल्या कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाले असून कामेही निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार होत असल्याचे आरोप आहेत. गृहमंत्री देशमुख यांनी जलसंधारणाची कामे निकृष्ट असल्याचा मुद्दा मागील वर्षी (२०२०) जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते. २३ जानेवारीला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गृहमंत्री देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जलसंधारण विभागाचे अधिकारी यांनी चौकशी पूर्ण न झाल्याची कबुली दिली. चौकशी करता नियुक्त करण्यात आलेल्या अभियंत्यांची बदली झाली. त्यामुळे ती पूर्ण झाली नसल्याचे अजब उत्तर त्यांनी दिले. विशेष म्हणजे आता नव्याने अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विभागाकडून चौकशीसाठी टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com