चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याच्या तयारीत होता युवक... मग अचानक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

पीडित चार वर्षीय चिमुकली ही जुना फुटाळा परिसरात राहते. तिचे वडील खासगी वाहनावर ड्रायव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. 1 जूनला सायंकाळच्या सुमारा पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. दरम्यान प्रज्वल (वय 18) नावाचा आरोपी तेथे आला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि एका मंदिरामागे नेले. तेथे तिला मोबाईलवर अश्‍लिल व्हिडीओ दाखवले. त्यानंतर तिचे कपडे फाडले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिने आरडाओरड केली.

नागपूर : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला एका युवकाने मोबाईलमधील अश्‍लिल व्हिडीओ दाखवून मंदिराच्या मागे नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यामुळे तिच्या वडिलांनी लगेच धाव घेतली. त्यामुळे आरोपी युवक पळून गेला. वडीलाच्या सतर्कतेमुळे एका मुलीची इभ्रत वाचली. ही दुर्दैवी घटना अंबाझरीतील जुना फुटाळा परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चार वर्षीय चिमुकली ही जुना फुटाळा परिसरात राहते. तिचे वडील खासगी वाहनावर ड्रायव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. 1 जूनला सायंकाळच्या सुमारा पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. दरम्यान प्रज्वल (वय 18) नावाचा आरोपी तेथे आला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि एका मंदिरामागे नेले. तेथे तिला मोबाईलवर अश्‍लिल व्हिडीओ दाखवले. त्यानंतर तिचे कपडे फाडले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिने आरडाओरड केली.

मुलगी घराबाहेर दिसत नसल्याचे लक्षात येताच शोध घेत असलेल्या वडीलाला मुलीचा आवाज ऐकू आला. त्यांनी लगेच काठी घेऊन मंदिराच्या दिशेने धाव घेतली. आरोपी कुकृत्य करण्याच्या तयारीत असताना दिसताच त्यांनी काठी फेकून मारली. मात्र त्याने लगेच पळ काढला. मुलीच्या वडीलाने रडत असलेल्या मुलीला कवेत घेतले. तिला घरी नेले. तिची समजूत घातली. त्यानंतर वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला.

गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

तिच्या वडीलाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपी प्रज्वलचा शोध घेत आहेत. तो सदरमधील रहिवासी असून जुना फुटाळा परिसरात कोकर्डे नावाच्या नातेवाईकांकडे पाहूणा म्हणून आल्याची चर्चा परिसरात होती. त्या युवकाबाबत सदर परिसरातही अशाच तक्रारी आहेत. प्रज्वल हा मानसिक विकृत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur youth tried to moles minor girl