अभियांत्रिकीत नॅक, "एनबीए'ची अट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गुणवत्तावाढीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना नॅक आणि एनबीए मानांकन आवश्‍यक केले आहे.

नागपूर  : अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना एनबीए (नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडीटेशन) आणि "नॅक'कडून मूल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. हे मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नव्या सत्रापासून शिष्यवृत्ती मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गुणवत्तावाढीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना नॅक आणि एनबीए मानांकन आवश्‍यक केले आहे. तसेच हा विषय शिष्यवृत्तीशी जोडून महाविद्यालयांना ते करणे अत्यावश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. 

यासंदर्भात राज्य शासनाने गतवर्षी परिपत्रक काढले. त्यात 2019-20 या शैक्षणिक सत्रापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी "एनबीए' आणि "नॅक' मूल्यांकन मिळविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या गोष्टीच्या फायदा घेत, काही महाविद्यालयांकडून ही अट यंदापासून लागू असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. 

अधिक माहितीसाठी - आता चिअर्सला नों लिमिट, या अल्कोहलचा लागला शोध

त्यातूनच सरकारकडून 2018-19 या सत्रात ते लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे विभागात बोटावर मोजण्याइतकी महाविद्यालये नॅक आणि एनबीए मानांकित आहेत. नव्या नियमानुसार जवळपास सर्वच महाविद्यालयांनी त्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे नव्या सत्रात या महाविद्यालयांना मानांकन मिळण्याची शक्‍यता आहे. 

 

महाविद्यालयांची धावपळ

 गतवर्षीच आलेल्या परिपत्रकामुळे महाविद्यालयांची धावपळ सुरू असल्याचे गेल्या सहा महिन्यांपासून दिसून येते. नागपूर विद्यापीठात जवळपास शंभराहून अधिक महाविद्यालयांनी नॅक आणि "एनबीए'साठी अर्ज केल्याचे दिसते. केवळ अभियांत्रिकीच नव्हे तर, एमबीए, बी.फार्म आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयांसह पारंपरिक अभ्यासक्रमाची महाविद्यालये "नॅक'साठी तयारी करीत आहेत. त्यामुळे येत्या काळात नॅक आणि एनबीए नामांकन मिळविणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naked in Engineering, "NBA Condition."