esakal | मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले शेकडो मुलींचे फोटो; लैंगिक अत्याचाराचा संशय

बोलून बातमी शोधा

Naked Pooja case of girls Photos of hundreds of girls found near Bhondubaba}

विक्कीला आणि इतरांना २० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून मुलींना आणण्यास सांगितले. त्यानुसार विक्की हा नागपुरातील एका मुलीच्या मागे लागला होता.

मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले शेकडो मुलींचे फोटो; लैंगिक अत्याचाराचा संशय
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्‍या डीआर ऊर्फ सोपान हरिभाऊ कुमरे (३५) या भोंदूबाबाच्या मोबाइलमध्ये शेकडो मुलींचे फोटो आढळले आहे. यावरून त्याने अनेक मुलींचा लैंगिक छळ केल्याचा तसेच अनेक मुलींची निर्वस्त्र पूजा केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांसमोर तपास करण्याचे नवे आवाहन उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी सोपानच्या महिला गुरूचा अपघाती मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी ती सोपानच्या स्वप्नात आली आणि ‘महाकालीची पूजा कर तुला धन मिळेल’ असे सांगितले होते. त्यानुसार तो अल्पवयीन मुलीच्या शोधात होता. चंद्रपूर ग्रामीण परिसरातील अनेक मुलींना त्याने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे त्याने नागपुरातील जुनी मंगळवारी येथे राहणाऱ्‍या विक्की खापरे याला हाताशी धरले.

अधिक वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

विक्कीला आणि इतरांना २० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून मुलींना आणण्यास सांगितले. त्यानुसार विक्की हा नागपुरातील एका मुलीच्या मागे लागला होता. परंतु, मुलीने विक्कीचा डाव ओळखून हिंमत करीत शहर गुन्हे शाखेचे कार्यालय गाठले आणि पोलिस उपायुक्त राजमाने यांच्याकडे तक्रार केली. पोलिस निरीक्षक सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांनी जाळे विणून पाचही आरोपींना ताब्यात घेतले व आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी घेतली.

नागपुरातील मुलीने केली हिंमत

पोलिसांनी डीआर ऊर्फ सोपानच्या मोबाइलची तपासणी केली असता त्याच्या मोबाइलमध्ये शेकडो अल्पवयीन मुलींची फोटो आढळून आली. त्यात भद्रावती येथील एका मुलीचा समावेश आहे. या मुलींचा डीआर व त्याच्या टोळीतील सदस्यांनी लैंगिक छळ केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु, बदनामीपोटी कुणी समोर न आल्याने त्यांचे कृत्य अंधारात होते. त्याबाबत कुणीही पुढे येत नव्हते. परंतु, नागपुरातील मुलीने हिंमत केल्याने या टोळीचे पितळ उघड पडले. भद्रावती येथील मुलीची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिस त्या मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.