नरखेडच्या स्वप्निलचे स्वप्न झाले पूर्ण, २५लाख रूपये जिंकले

अतुल दंढारे
Thursday, 15 October 2020

त्याला आभाळ ठेंगणे झाले. मजल दरमजल करीत तो बुधवारी २५लाखांपर्यंत पोहोचला. १ कोटी जिंकण्याची उमेद त्याच्यामध्ये दिसून येत होती. टिव्हीसमोर सगळ्यांची उत्कंठा ताणली जात असताना एका कठीण प्रश्‍नाजवळ मात्र तो थबकला. त्याने पुढील ‘रिस्क’ न घेता २५ लाखावर थांबण्याचा निश्‍चय केला.

मेंढला (जि.नागपूर) : 'करोडपती’ होण्याचे स्वप्न कोण पाहात नाही? परंतू श्रीमंत होण्याची इच्छा मात्र एखाद्याचीच पूर्ण होते बरं का !  नशीबाची साथ मिळाली की तो ‘मुकद्दर का सिकंदर’ व्हायला वेळ लागत नाही. त्यासाठी कुठला वशिला वगैरे लागत नाही. नरखेड शहरातील स्वप्निलचे मात्र नशिब उजळले. ‘कौन बनेगा करोडपती’या एका खासगी वाहिनीतील कार्यक्रमात त्याला महानायकासोबत करोडपती होण्याची संधी प्राप्त झाली. सद्या सुरू असलेल्या लोकप्रिय मालिकेत त्याला पंचवीस लाखांपर्यंत मजल मारता आली आणि तो लखपती झाला. याचा गावकऱ्यांना अत्यानंद झाला.

अधिक वाचाः काय सुरू आहे वाडीत ? नाल्या झाल्या वर अन् दुकाने खाली !

आभाळ ठेंगणे झाले !
त्या युवकाचे नाव स्वप्नील रमेश चौहान (नरखेड) असे आहे. न.प.शाळा येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती चौहान यांचा तो धाकटा मुलगा. शालेय शिक्षण न.प. शाळा क्र.५, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शाळा क्र.१ आणि अकरावी व बारावी स्वप्निलने नाडेकर कनिष्ठ महाविद्यालयात केले. विज्ञान शाखेतीन शिक्षण घेवून नंतर युडिसीटी औरंगाबाद येथून स्वप्निलने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.अत्यंत हुशार, निडर आणि तल्लख बुद्धी हे स्वप्नीलचे गुणवैशिष्ट्ये. सन१९९०च्या दहावीच्या बॅचचा न.प. हायस्कूलचा तो माजी विद्यार्थी.
आज स्वप्नील मुंबई येथे एका नामांकीत कंपनीत मोठ्या पदावर काम करतो आहे. स्वप्नीलचे सामान्यज्ञान सुरवातीपासूनच खूप छान असल्याचे त्याचे गावातील मित्र सांगतात. याचीच प्रचिती त्याने ‘केबीसी’ साऱ्या जगाली आणून दिली. त्याची निवड ‘केबिसी’  झाल्यानंतर त्याला आभाळ ठेंगणे झाले. मजल दरमजल करीत तो बुधवारी २५लाखांपर्यंत पोहोचला. १ कोटी जिंकण्याची उमेद त्याच्यामध्ये दिसून येत होती. टिव्हीसमोर सगळ्यांची उत्कंठा ताणली जात असताना एका कठीण प्रश्‍नाजवळ मात्र तो थबकला. त्याने पुढील ‘रिस्क’ न घेता २५ लाखावर थांबण्याचा निश्‍चय केला. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सर्व प्रश्नांना त्याने अचूक उत्तरे दिली.

अधिक वाचाः परतीचा पाऊस आभाळातून नव्हे, ढसा ढसा डोळ्यातून बरसला !
 

अर्जुनच्या शिक्षणाकरीता ५ लाख रुपयांची स्कॉलरशिप   
स्वप्नील आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. ‘केबीसी’ सारख्या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमात आणि अमिताभसारख्या महानायकाच्या प्रश्नाला सामोरे जाताना जो आत्मविश्वास, ज्ञान आणि चातुर्याचे तू जे दर्शन घडविले त्याचा आम्हाला अभिमान असल्याच्या भावना त्याचे गावचे मित्र व्यक्त करतात. तो या मालिकेत २५ लाख रुपये जिंकून थांबला. स्वप्निलचा मुलगा अर्जुन स्वप्नील चव्हाण (वय १५)  याच्या पुढील शिक्षणाकरीता ५ लाख रुपये स्कॉलरशिप   अमिताभने जाहिर केली, तेव्हा स्वप्निल भावविभोर झाला. एमआयडीसीत युवकांसाठी एखाला ‘प्रोजेक्ट’ सुरू करण्याचा त्याने मानस व्यक्त केला. त्याच्या  या विजयाने गावात बुधवारी आनंदाचे वातावरण होते.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narkhed's dream came true, won Rs 25 lakh