Video : नेचर इज ग्रेट... सावली सोडणार तुमची साथ...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अंश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्तादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्‍यावर येतो. याचाच अर्थ दोनदा शून्य सावली दिवस येतात. हा बिनसावलीचा दिवस नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना रविवार(ता. 24)पासून अनुभवता येणार आहे.

नागपूर : वर्षातून दोन दिवस असे येतात की, या दिवशी आपली सावली दिसत नाही. काही क्षणापुरती सावली गायब होते. हा बिनसावलीचा दिवस नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना रविवार(ता. 24)पासून अनुभवता येणार आहे.

 

प्रारंभ नागपूर शहराच्या पूर्व भागात असलेल्या भिवापूर आणि उमरेडपासून होणार आहे. भिवापूरला दुपारी 12 वाजून आठ मिनिटांनी; तर उमरेड येथे 12 वाजून नऊ मिनिटांनी हा क्षण अनुभवता येणार आहे.

राज्यात 31 मेपर्यंत शून्य सावली

सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अंश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्तादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्‍यावर येतो. याचाच अर्थ दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायन होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज 0.25 अंशाने सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर 4 दिवस राहतो. त्यामुळे एकाच 0.50 ठिकाणावरून दोन दिवस आणि 0.25 अंशावर एक दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. महाराष्ट्रात तीन मे ते 31 मेपर्यंत शून्य सावली दिवस येतात.

सूर्य डोक्‍यावर आला की सावली गायब
कोणतीही उभी वस्तू, मनुष्य उन्हात सरळ उभी राहिल्यास सूर्य अगदी डोक्‍यावर आला की सावली दिसत नाही.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, स्काय वॉच ग्रुप.

जाणून घ्या : आता निसर्ग पर्यटनाला चालना देणारे नवे पर्यटन धोरण, स्थानिकांना मिळणार रोजगारही

नागपूर जिल्ह्यातील शून्य सावलीदिन

तारीख : ठिकाण : वेळ
------------------------------

  • 24 मे : भिवापूर :  (12.08)

उमरेड : (12.09)

  • 25 मे : कुही : (13.09)

हिंगणा : (12.12)
बुटीबोरी : (12.11)

  • 26 मे : नागपूर शहर : (12.10)

कामठी : (12.10)
कळमेश्वर : (12.11)

  • 27 मे : मौदा : (12.09)

रामटेक : (12.10)
काटोल : (12.13)
पारशिवनी : (12.10)
सावनेर : (12.11)

  • 28 मे : नरखेड : (12.13)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nature is great ... the shadow will leave you