कथित नक्षलवादी साईबाबा करणार व्यायाम, डॉक्‍टरांकडून दीड तास तपासणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

नक्षलवादाचा प्रचार व प्रसार करण्याचा आरोप असलेला दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी.एन. साईबाबा आणि त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध नक्षलवादी संघटनेच्या सदस्यत्वाबाबतचा आणि देशविघातक कृत्य करण्याचा गुन्हा सिद्ध झाला असून मंगळवारी गडचिरोली सत्र न्यायालयाने ५ जणांना जन्मठेप आणि एकाला १० वष्रे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नक्षलवाद्यांना शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कथित नक्षलवादी साईबाबा यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दीड तास वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विशेष असे की, यावेळी कोणत्याही मेडिसीन किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासणी न करता मेडिकलच्या भौतिकोपचार विभागात तपासणी केली. यावेळी डॉक्‍टरांनी त्याला व्यायामाचा सल्ला दिला. हा व्यायाम करण्यासाठी मेडिकलमध्ये येण्याची गरज नसून कारागृहातच व्यायाम शक्‍य असल्याचे तपासणीअंती स्पष्ट करण्यात आले. 

कथिक नक्षलवादी साईबाबा हा दिव्यांग आहे. याशिवाय विविध आजार आहेत. अधून-मधून खांदे दुखण्यापासून तर डोकं आणि इतर आजारासाठी मेडिकल, सुपर स्पेशालिटीमध्ये तपासणीसाठी आणण्यात येते. मात्र, मंगळवारी साईबाबाला भौतिकोपचार विभागात आणले. विशिष्ट अशा व्यायामाची गरज असल्याचे सांगत ती सोय करण्यासह इतरही काही मागण्या साईबाबांनी केल्या होत्या. त्यावरून मेडिकलमध्ये अस्थिरोग विभाग, व्यवसायोपचार व भौतिकोपचार विभागासह इतर इतर विभागाच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची एक समिती गठित करण्यात आली होती. साईबाबाला मंगळवारी मेडिकलमध्ये सकाळी दहाच्या सुमारास कडेकोट सुरक्षेत आणले. त्याच्या तपासणीसाठी सुरक्षिततेसाठी वेगळीच व्यवस्था करण्यात आली होती. अस्थिरोग विभाग, भौतिकोपचार विभागात तज्ज्ञांकडून त्याची सलग दीड तास तपासणी करण्यात आली. 

वाचा : इतवारीत केमिकल, रंग, प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

शरीराची अधिक हालचाल करू नये 
व्यवसायोपचार व भौतिकोपचार विभागाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला शरीराची खूप जास्त हालचाल न होणाऱ्या काही विशेष आसनांचा सल्ला देण्यात आला. हा व्यायाम कारागृहात स्वतः करू शकत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, इतर काही निरीक्षणेही मेडिकलच्या डॉक्‍टरांनी नोंदवले आहेत. हा अहवाल लवकरच संबंधित यंत्रणेला देण्यात येईल. मेडिकलच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naxalites helper accused professor saibaba medical treatment