कोरोनाच्या सावटातही सुरळीतपणे पार पडली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा; तब्बल ५०७५ विद्यार्थ्यांची उपस्थिती

NCRT exam completed in Nagpur district even in Corona
NCRT exam completed in Nagpur district even in Corona

कामठी (जि . नागपूर): : इयत्ता १० वीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेवून बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम  शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने  त्यांना आर्थिक सहाय्य करावे या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली द्वारा आयोजित परीक्षेला जिल्ह्यातील ५०७५ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील विविध १६ केंद्रावर कोरोनाच्या सावटाखाली परीक्षा दिली.

बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्याथ्र्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्राची सेवा करावी या उद्येशाने  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजीत २०१२-१३ पासून ही परिक्षा वर्ग १० वी साठी राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर या दोन स्तरावर घेण्यात येत असून बौध्दीक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर घेण्यात येत असून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दु, गुजराती, कन्नड व तेलगू या सात माध्यमांपैंकी एका माध्यमातून ही परिक्षा देता येते. 

प्रथम राज्यस्तर व नंतर राष्ट्रीयस्तरावर झालेल्या या परिक्षेमध्ये गुणाणुक्रमे उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती करीता पात्र ठरतात. नागपूर जिल्ह्यातील  विविध शाळेतील दहावीत शिकत असलेल्या ५०७५ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील एकूण १६ केन्द्रांवर परीक्षा दिली. जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा परिषदेच्या गाईड लाईन नुसार परीक्षा केंद्रांवर  आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. 

जिल्हा समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मार्गदर्शनात विज्ञान पर्यवेक्षक मदन बोरकर यांनी काम सांभाळले तर कामठी तालुक्यातील नूतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या केंन्द्रावर तालुक्यातील २५५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित झाले होते. कामठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप नागपूरे यांच्या मार्गदर्शनात केन्द्र संचालक वामन मन्ने यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परिक्षा परिषदेच्या गाईडलाईननुसार योग्यरित्या काम हाताळले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com