आनंदाची बातमी : 'निओवाईस' धूमकेतू पाहण्याचा दुर्मिळ योग 

Neowise Rare Comet To Be Seen Very Soon
Neowise Rare Comet To Be Seen Very Soon
Updated on

नागपूर : तब्बल साडेचार हजार वर्षानी प्रथमच सुर्याजवळ आलेला "निओवाइस' हा दुर्मीळ धूमकेतू भारतातील खगोलप्रेमींना आकाशात पाहण्याची संधी पुढील 15 दिवसात मिळणार आहे. असा योग पुन्हा 6 हजार 800 वर्षांनी पुन्हा येणार आहे. साध्या डोळ्याने तो एखाद्या ताऱ्याप्रमाणे दिसेल. परंतु, लहान दुर्बिण किंवा द्विनेत्रीने त्याची सुन्दर शेपटी पाहायला मिळेल अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष आणि खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

पुढील पंधरा दिवस हा धूमकेतू उत्तर गोलार्धाच्या उत्तर पश्‍चिम आकाशात सप्तर्षीजवळ सूर्यास्तानंतर लगेच दिसेल. मात्र, तो सूर्याच्या जवळ असल्याने केवळ 20 मिनिटेच पाहण्याची संधी राहील. सध्या तो सप्तर्षीच्या खाली दिसत आहे. 15 जुलै आणि नंतर हा धूमकेतू सप्तर्षीजवळ डाव्या बाजूला दिसू शकेल. ऑगस्टनंतर तो खूप वेगवान होईल. अमेरिका आणि अन्य देशातून धूमके तूचे खूप सुंदर छायाचित्र घेण्यात आले आहे. तसेच जळगावच्या खगोल मंडळालादेखील चांगले छायाचित्र मिळाले आहे.

मार्चमध्ये तो सापडल्यापासून पार्कर सोलर प्रोब, नासाचे सौर आणि स्थळीय वेधशाळा, ईसा/नासा सौर आणि हेलिओसफे रीक वेधशाळेने तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर यांच्यासह अनेक नासा अंतराळ यानांद्वारे शोधले गेले. पावसाळ्यामुळे समस्या असली तरीही जेव्हा आकाश ढगाळ नसेल तेव्हा सर्व खगोलप्रेमींनी या सुंदर धूमकेतूचे निरीक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

लढणाऱ्यांसाठी गौरव ठरला प्रेरणास्रोत

सन 2020 मध्ये स्वान आणि ऍटलासनंतरचा हा तिसरा धूमकेतू आहे. परंतु, उघड्या डोळ्याने दिसणारा पहिलाच धूमकेतू आहे. या धूमकेतूचा शोध यावर्षी 27 मार्च 2020 मध्ये निओ वाईस मोहिमेअंतर्गत अंतराळ दुर्बिणीद्वारे लागला. 

धूमकेतू पृथ्वीपासून जाणार दहा अब्ज किमी दुर 

या धूमकेतूचे अधिकृत नाव C / 2020 F3 आणि टोपणनाव निओवाईस असे ठेवले गेले. हा धूमकेतू आता उघड्या डोळ्यांना दिसण्याइतका तेजस्वी आहे. 23 जुलै रोजी पृथ्वी जवळ येणार असल्याने अधिक स्पष्ट दिसेल. निओवाईस पाहणे ही एक आजीवन संधी आहे. कारण हा धूमकेतू पुन्हा सहा हजार आठशे वर्षे पृथ्वीजवळ येणार नाही. तो दहा अब्ज किमी दूर जाईल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com