आनंदवार्ता, महाराजबागेत येणार नवीन पाहुणा...कोणता?

राजेश रामपूरकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात चार जणांचा जीव घेणाऱ्या एनटी १  वाघाला गोरेवाड्यात आणले आहे. तो अजूनही विलगीकरणात आहे. पिंजरेही हाऊसफुल्ल झाल्याने या वाघाला महाराजबागेत हालवण्यात आल्यास ‘जान' वाघिणीला एनटी १  च्या रूपाने जोडीदार मिळणार आहे. ‘ली’ या वाघिणीला गोरेवाडा केंद्रात महाराजबागतून ब्रीडिंगसाठी पाठविले आहे. तर, दुसरी वाघीण ‘चेरी’ हिची छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. ‘जान'ला जोडीदार मिळावा यासाठी महाराजबाग व्यवस्थापन वन विभाग आणि अन्य प्राणिसंग्रहालयाकडे नर वाघाची मागणी करीत आहे. 

नागपूर,  ः गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील सर्व पिंजरे सध्या भरले असल्याने येथील वाघाला आता महाराजबाग प्राणिसंग्रहालयात हालविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोरेवाडा प्रशासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पत्र पाठवून एनटी १ वाघाला महाराजबागेत पाठवले जाऊ शकते असे म्हटले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर या वाघाचा मुक्काम महाराजबागेत हालवला जाण्याचे संकेत आहेत. 

ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात चार जणांचा जीव घेणाऱ्या एनटी १  वाघाला गोरेवाड्यात आणले आहे. तो अजूनही विलगीकरणात आहे. पिंजरेही हाऊसफुल्ल झाल्याने या वाघाला महाराजबागेत हालवण्यात आल्यास ‘जान' वाघिणीला एनटी १  च्या रूपाने जोडीदार मिळणार आहे. ‘ली’ या वाघिणीला गोरेवाडा केंद्रात महाराजबागतून ब्रीडिंगसाठी पाठविले आहे. तर, दुसरी वाघीण ‘चेरी’ हिची छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. ‘जान'ला जोडीदार मिळावा यासाठी महाराजबाग व्यवस्थापन वन विभाग आणि अन्य प्राणिसंग्रहालयाकडे नर वाघाची मागणी करीत आहे. 

आम्हालाही क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी का दिले जाणून घ्या...

गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामध्ये वाघांसाठी १० पिंजरे आहेत. सध्या येथे दहा वाघ आहेत. महाराजबागेतील ‘जान' वाघिणीचे वय ११ वर्षांचे झाले आहे. तिला जोडीदार देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून यामुळे महाराजबागेत नवीन पाहुणा येणार हे निश्चित झाले आहे. मात्र, तारीख निश्चित झालेली नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Tiger Will come in Maharajbagh