'प्यार हमे किस मोड पे ले आया' 

मिलिंद लोहे
बुधवार, 15 जुलै 2020

बिग बी आणि त्यांचे आजार हे नेहमीच त्यांच्या सिनेमासारखे चर्चित राहिले आहेत. फटाक्‍याने "शहंशाह'चा हात भाजला असो किंवा "कुली'दरम्यान पोटावर लागलेली जीवघेणी खुर्ची असो. या सर्वांमधून ते सुखरूप बाहेर आले.

नागपूर : दोन दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कोरोनाच्या संसर्गापेक्षाही जास्त वेगाने "व्हायरल' होत तमाम चाहत्यांची झोप उडवून गेली. "बिग बी'सोबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, अभिनेत्री सून ऐश्‍वर्या आणि नातीण आराध्या हिलाही संसर्ग झाल्याचे समोर आले. योगायोगाने अभिनेत्री रेखाच्या बंगल्यालासुद्धा प्रतिबंधित "रेखा' ओढल्याची बातमीही तेव्हाच झळकल्याने अनेकांना त्यांच्या "प्यार की कहानी'ची आठवण झाली. कोरोनावर मात करण्यासाठी सध्यातरी कोणतेही औषध निघाले नसले तरी ही केमिस्ट्री छान जुळून आल्याचा "सिलसिला' आता कायम स्मरणात राहणार हे मात्र नक्‍की. 

"मोहब्बत की मिसाल देगा सदियों तक जमाना 
कोरोना अमिताभ को और बंगला रेखा का सील हो जाना' 
यासारख्या शेरो शायरी होत असल्याने या "दो अनजाने?'च्या अनेक जुन्या कथांना उजाळा मिळाला. 

उघडून तर बघा - विश्‍वास बसेल का? मुख्यमंत्री उद्धवजी आमदार झाले मात्र निधी नाही, वाचा संपूर्ण प्रकार...
 

बिग बी आणि त्यांचे आजार हे नेहमीच त्यांच्या सिनेमासारखे चर्चित राहिले आहेत. फटाक्‍याने "शहंशाह'चा हात भाजला असो किंवा "कुली'दरम्यान पोटावर लागलेली जीवघेणी खुर्ची असो. या सर्वांमधून ते सुखरूप बाहेर आले. "कुली'च्या अपघातादरम्यान रेखा वैष्णोदेवीला साकडे घालायला गेल्याच्या बातम्यांचाही खूप गाजावाजा झाला होता. सध्या कोरोनाकरिता उपचार घेत असलेले बिग बी कोरोनाच्या "गहरी चाल'ला नक्‍कीच मात देतील, असा विश्‍वास तमाम चाहत्यांनी केलेल्या पूजा, प्रार्थनावरून दिसून येतो. 

बिग बी आणि रेखाची जोडी पडद्यावर प्रेक्षकांनी पार उचलून धरली. त्यांच्या गॉसिप्सच्या बातम्यांनाही चाहत्यांनी चांगलेच डोक्‍यावर घेतले. योगायोगाने त्यांचा वाढदिवसही ऑक्‍टोबर महिन्यातच 10 आणि 11 असा एकामागे एक येतो. इतके दिवस अभिषेकला काम नव्हते नेमके आत्ताच बाहेर निघून त्याने बिग बीला अडचणीत आणल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे. 

 

"दोस्ताना' टिकणार नाही 

कोरोना आणि बच्चनचा "याराना' फार काळ टिकणार नाही. "शहंशाह'सोबतच इतरांनीही या संसर्गातून सुखरूप बाहेर निघावे अशी "शक्‍ती' सर्वांना लाभावी आणि विलगीकरणातून बाहेर येत एखाद्या उंच इमारतीवरून "मैं आजाद हूँ' अशी हाक सर्वांनी द्यावी, अशी मनीषा बाळगायला काही हरकत नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about actor Amitabh Bachchan and Rekha