कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांची रात्र फुटपाथवर; रात्री साथीला मोकळे आकाश

The night of the relatives of the Corona victims goes to the sidewalk
The night of the relatives of the Corona victims goes to the sidewalk

नागपूर : साहेब, धन्याला उपचारासाठी घेऊन आलो जी. लेकरू लहान आहे. त्यामुळे लेकराला सोबत आणले. सासू सोबत आहे. घराला कुलूप ठोकले. सारे जण येथे आलो. नवरा हातमजुरी करतो. मीबी वीट भट्टीवर कामाले जातो. पतीला कोरोना झाला. आजूबाजूच्या लोकांनी घरी येणं सोडलं. यामुळेच सारे नागपुरात आलो. दिवसभर येथी रस्त्यावर बसून रायतो. येथीच थोडं दूर एका आडोशाला जेवण तयार करतो. या भावना आहेत गडचिरोली येथून उपचाराला आलेल्या एका पत्नीच्या. घरधनी सुधारला की, की जाईन घरी...पण डॉक्टरांनी सांगितले तब्येत लई खराब आहे... कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सुधारेल याच आशेवर या कुटुंबाचे जगणे रस्त्याच्या कडेला सुरू आहे. 

कुणाच्या काळजाचा तुकडा तर कुणाच्या कपाळावरचे कुंकू असलेला धनी मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. घरात अठराविश्‍वे दारिद्र्य असलेल्या या बाहेरगावच्या नातेवाइकांच्या आरोग्याचा आधार मेडिकल आहे. रस्त्यावरील नातेवाइकांनी संख्या मोजली असता अडीचशेच्या वर नातेवाईक आवारात होते. या नातेवाइकांना ‘निवारा' मिळणे हे देखील एक स्वप्नच बनून राहणार काय? हा या नातेवाइकांचा सवाल आहे.

भीक मागून आयुष्य जगणाऱ्या रस्त्यावरील बेघरांना रात्री झोपण्यासाठी आश्रय आहे. त्यांच्यासाठी शहराच्या विविध भागात "नाइट शेल्टर' (रात्र निवारा) उभारले आहेत. परंतु कोरोनाबाधितांचे नातेवाईक दिवसभर कोविड हॉस्पिटलला लागून असलेल्या फुटपाथवर दिवसात. दिवस असो की, रात्र...त्यांच्या साथीला मोकळे आकाश असते. 

याच फुटपाथवर मोकळ्या आकाशाचे पांघरून घेऊन बाधितांचे नातेवाईक रात्र काढतात. पंधरा ते वीस दिवसांसाठी या नातेवाइकांचा मुक्काम पोस्ट मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलमधील फुटपाथवर असतो. मेडिकलमध्ये सद्या साडेपाचशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहेत. यातील ३० टक्के रुग्ण हे बाहेरगावचे आहे. 

तीन विटांची चूल

गरीब कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालये न परवडणारी आहेत. मेडिकल मेयो शिवाय पर्याय नाही. सरकारी दरात किंवा मोफत उपचार होतात म्हणून मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलच्या भरवशावर बरे होण्याच्या प्रतिक्षेत येथे शेकडो कोरोनाबाधित रुग्ण व त्यांचे नातेवाइक उपचारासाठी आले आहेत. कोरोना वॉर्डात रुग्णांच्या नातेवाइकांना प्रवेश नाही.

यामुळे बाधिताला भरती केल्यानंतर किमान पंधरा दिवस ते महिनाभर नातेवाइकांचा मुक्काम येथे असतो. सकाळच्या चहापासून तर रात्रीचे भोजन तयार करण्यासाठी तीन विटांची चूल मांडून येथे जगत आहेत. यांच्यासाठी रात्रीचा निवारा नसल्याची खंत इंटकचे नेते त्रिशरण सहारे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com