सरकार फक्त तीन टक्केच शेतकऱ्यांना देणार मदत!; कारण वाचून बसेल धक्का

नीलेश डोये
Tuesday, 10 November 2020

प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात हेक्टरी मदत ६ हजार ८०० रुपये शेतपिकांसाठी तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये धरण्यात आले आहे. सरकारची मदत रक्कम जास्त आहे. त्यामुळे सरकारच्या रकमेतून शंभरच्या जवळपास शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

नागपूर : जिल्ह्यातीत शेतकऱ्यांना मदतीसाठी ६४ कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असताना सरकारकडून फक्त १७ लाख ८३ हजार रुपये देण्यात आले. या निधीतून जवळपास तीन टक्केच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देता येणार आहे. यामुळे ९७ टक्के शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे दिसते.

जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान आलेली अतिवृष्टी, पूर, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. किडीमुळे सोयाबीनचे पूर्ण हातची गेली. प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात ६८ हजार ९६८ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. तर ९ हजार ७२१ हेक्टरमध्ये संत्रा, मोसंबी पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले. यामुळे १ लाख ९ हजार ६६१ शेतकरी बाधित झाले.

या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ६४ कोटी ३९ लाख ६४ हजार ८० रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला. विशेष म्हणजे सरकारने शेतपिकांसाठी हेक्टरी १० हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये प्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले.

क्लिक करा - सरकार परत घेणार शेतकऱ्यांचा ‘सन्मान’; तुमचा तर यात समावेश नाही ना

प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात हेक्टरी मदत ६ हजार ८०० रुपये शेतपिकांसाठी तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये धरण्यात आले आहे. सरकारची मदत रक्कम जास्त आहे. त्यामुळे सरकारच्या रकमेतून शंभरच्या जवळपास शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ninety seven percent of farmers are in Diwali darkness